आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रदिनी सजले फेसबुक, व्हॉट्सअॅप कट्टे: ग्रिटिंग्जचा जमाना कमी झाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- काव्यमय शब्दांतून मैत्रीतील नात्याचे कौतुक करताना विविध छायाचित्रांचा वापर करण्यात तरुणाई पुढे होती. ग्रिटिंग्जचा जमाना कमी झाला. ग्रिटिंग्जचा जमाना आलाय. विश केल्याशिवाय मैत्रीला पूर्णत्वच नाही. व्हॉटस ग्रुपवरही तसेच. प्रत्येक ग्रुपमध्ये नवे छायाचित्र, नव्या मैत्रदिन शुभेच्छा संदेश देण्याचा ट्रेंड चांगलाच रूळला. शुभेच्छा देत आभासी विश्वात मैत्री घनिष्ठ असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात भेट नसतेच ती. म्हणूनच वेळात वेळ काढून मित्रांना वैयक्तिक शुभेच्छाही दिल्या गेल्या. सायंकाळी विविध ठिकाणी आपापला क्लाेज ग्रुपही जमल्याचे दिसून आले. आपापल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पार्टी वा एकत्रित येण्याचा प्लॅन बनवला. फ्रेंडशिप बँड बांधून काहींनी मैत्रीचा विश्वास अधिक दृढ केला.

कुचन प्रशालेच्या मैदानावर पोलिस भरतीस आलेल्या युवतींनी फ्रेंडशिप बँड बांधून मैत्रदिन साजरा केला. काहींनी झाडांनाही फ्रेंडशिप बँड बांधून निसर्गाशी नाते जोडले.
वादळ येतात अन् निघूनही जात असतात. वादळ महत्त्वाचे नसते, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो याचा असतो. दीपालीजाधव, प्रशिक्षणार्थी
"मैत्रीमध्ये ना खरं
ना खोटं असतं,
मैत्रीमध्ये ना माझं
ना तुझं असतं...
कुठल्याही पारड्यात तिला तोला,
मैत्रीचं पारड नेहमी जडच असतं...
मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते,
मैत्री सुंदर किंवा कुरूप नसते...
कुठल्याही क्षणी पाहा
मैत्री फक्त मैत्रीच असते.
अशा अनेक उत्तमोत्तम कवितांच्या पंक्तीसह "हॅपी फ्रेंडशिप'च्या शुभेच्छा देत फेसबुक व्हॉट्सअॅपचा कट्टा फुलला आहे.
मैत्री म्हणजे, माणुसकीच्या गावात जाणारी पायवाट
भिजून चिंब करणारी समुद्राची उसळती लाट
मैत्री म्हणजे, वादळात दिव्याभोवती पसरणारे हात
संकटकाळात खांद्यावर हात ठेवणारी अलगद साथ
मैत्री म्हणजे, स्वप्नभंग पावणारी चंदेरी रात
बालपणी जमवलेल्या आठवणींची तुफान बरसात...!
मैत्रदिनी सजले फेसबुक, व्हॉट्सअॅप कट्टे
बातम्या आणखी आहेत...