आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या वसाहतीत कल्याण निधी वापरून नागरी सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पोलिसवसाहतींकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे पोलिस आयुक्तांच्या पुढाकाराने पोलिस कल्याण निधीतून विकासकामांना सुरुवात केली आहे. शासकीय वसाहती आणि कार्यालयांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असते. निधीअभावी काम थांबले असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.

केशव नगर, वसंत नगर, सदर बझार या तिन्ही सह सर्वच पोलिस वसाहतींना समस्यांचा विळखा आहे. ड्रेनेजलाइन वारंवार तुंबणे, अंतर्गत खराब रस्ते, उकिरडा नाही, रस्त्यावर कचरा पसरणे, पथदिवे बंद असणे, इमारतींना तडे जाणे, बाथरुमचे दरवाजे नादुरुस्त, छताला गळती, काटेरी झुडूपे, संरक्षण भिंत आदी अनेक समस्या आहेत. याबाबत पोलिस प्रशासनाने विभागास पत्रे दिली. फोन केला आणि थेट भेटही घेतली.

मात्रविभागाकडून काम झाले नाही. निधी नाही, हे एकच उत्तर मिळाले. अखेर पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी पुढाकार घेतला. पोलिस कल्याण निधीच्या माध्यमातून त्यांनी केशव नगर येथे एका ठिकाणी लहान अशी सुरक्षा भिंत बांधली, काटेरी झुडपे काढून घेतली, उद्यान सुशोभीकरण हाती घेतले आहे. यापूर्वी आयुक्तांनी अरविंद धाम पोलिस वसाहतीमध्ये मुलांना खेळणीचे उद्यान, ओपन जिम, रस्त्याच्या कडेने झाडी आदी उत्तम अशी सोय केली आहे.
केशवनगर वसाहतीमध्ये उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.

निधी नाही - विलासमोरे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
पोलिसवसाहतींमध्येमोठ्या प्रमाणात दुरुस्तीची कामे आहेत. याच्या खर्चाचा अंदाज तयार करून वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे. निधीची कमतरता असल्यामुळे हे काम थांबले आहे. निधी उपलब्ध होताच दुरुस्त करून घेऊ.”

अधिवेशनात लक्षवेधी
पोलिसवसाहतींकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. निधीची कमतरता आहे. तसेच या वसाहती जीर्ण झाल्या असून नव्या उभ्या करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे हा प्रश्न विधानसभा अधिवेशनात मांडणार आहे. यामुळे सोलापूर शहरातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिस वसाहतींचा प्रश्न सुटेल, अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...