आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल ८० कोटींचे मिळकत कर थकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मार्चमहिना आला तरीही महापालिकेची मिळकत कर थकबाकी वसूल होत नाही. त्यामुळे महापालिका वसुली मोहीम सुरू केली आहे. तब्बल ८० कोटी रुपयांची थकबाकी आहे. सगळ्यात जास्त रेल्वेची २० कोटी तर त्यानंतर वल्याळ दंत महाविद्यालयाची सुमारे एक कोटीची थकबाकी आहे.
प्रशासनाने थकबाकीदारांची यादी तयार केली. त्यात शहरात सुमारे २५०० तर हद्दवाढ भागातील २२२ जणांचा समावेश आहे. यात शासकीय इमारती. सहकारी संस्था, शिक्षण संस्थाचा समावेश जास्त प्रमाणात आहे. वसुलीसाठी महापालिकेने जप्तीच्या नोटिसा १५ डिसेंबर रोजी दिल्या. त्यांची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपली. त्यामुळे यापुढे जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी दिली.

शहरात मिळकत करांची थकबाकी सुमारे ८० कोटीपर्यंत आहे. त्यात रेल्वे विभागाची सर्वात जास्त २० कोटींची आहे. याशिवाय हद्दवाढ भागात शिक्षण संस्था, कारखाने आदींचा समावेश आहे. यात सर्वात जास्त ९९.३४ लाख रुपयांची थकबाकी वल्याळ डेंटल महाविद्यालयाची आहे. या महाविद्यालयाने महापालिकेस पत्र व्यवहार करून कर कमी असल्याचाे मत मांडले. त्यावर अंतिम निर्णय झाला नाही.

मोहीम सुरू करणार
^मिळकत कर थकबाकीदारांची यादी तयार केली असून, शहर आणि हद्दवाढ भागात मोहीम सुरू केली आहे. यापुढे जप्ती, नळ जोड तोडणे आदी कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकीदारांनी रक्कम भरावी.” अमिता दगडे-पाटील, सहाय्यकआयुक्त, कर आकरणी