आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनी एनए नसताना व्यावसायिक वापर, तहसीलदारांनी दिला प्रांताधिकारी यांना अहवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील शासकीय भूखंडाच्या शर्तभंग प्रकरणानंतर महसूल प्रशासनाने शेत जमीन क्षेत्र बिनशेती (एनए) करताच व्यावसायिक अथवा रहिवास क्षेत्र म्हणून वापर सुरू करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली अाहे.
शेतजमीन बिनशेती क्षेत्र म्हणून घोषित करताच सुमारे ४१ जणांनी व्यावसायिक, रहिवास कारणासाठी शेतजमिनीचा वापर केल्याचा अहवाल उत्तर तहसीलच्या तलाठी मंडल अधिकाऱ्यांच्या पाहणीत अाढळून अाले अाहे. प्रत्यक्षात संबंधित सात-बारा उताऱ्यावर बिनशेती म्हणून तलाठ्यांच्या नोंदी अाहेत. तहसीलदाराने ४१ प्रकरणांचा हा अहवाल कारवाईसाठी पाठवला असून दंडात्मक कारवाई झाल्यास लाखोंचा महसूल वसूल होऊ शकतो, असा दुजारा प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी दिला अाहे.

उत्तर सोलापूर तालुक्यात तहसीलदार अथवा जिल्हाधिकारी यांच्याकडून कसलीही परवानगी घेता तिऱ्हे, कोंडी, शिवाजीनगर, केगाव येथे शेतजमिनीचा वापर रहिवास वाणिज्य कारणासाठी केला जात असल्याचा अभिप्राय अहवालात दिला अाहे. शहर हद्दीतील २० तर ग्रामीणमधील २१ अशा ४१ प्रकरणी बिनशेती सारा ४० पट दंडाची वसुली करण्यासंदर्भातील अहवाल तहसीलदार समाधान शेंडगे यांनी प्रांताधिकारी पवार यांच्याकडे नुकताच पाठवला अाहे. दंड प्रकरणात प्रांताधिकारी काय निर्णय घेणार ? याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अनधिकृत वापर सुरू असलेली प्रकरणे
तिऱ्हेयेथील प्रकरणात अर्जुन गायकवाड, मोहन भोसले, भीमराव गायकवाड, मनोरंजन जाधव यांच्यासह २० जणांचे भूखंड अाहेत. शहरातील शिवाजीनगर येथे अशोक राठोड तर केगाव येथे गोपाळ विजय दळवे, प्रार्थना नितीन बिज्जरगी, सुनील बसवंत सावळगी, अण्णासाहेब किसनराव रणसिंग, डॉ. विश्वनाथ कराड यांच्या नावे भूखंड अाहेत. कोंडी येथे तिम्मा व्यंकप्पा धोत्रे, सिद्धेश्वर चौगुले, सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ, हणमंतू सिद्राम कुंभार, नागनाथ विठ्ठल कुंभार, शिवाजी जनार्दन सुतार, नारायण पापण्णा निंबाळकर, ज्ञानेश्वर अर्जुन मोरे, नानासाहेब नरसिंह भोसले, निवृत्ती ज्ञानोबा जाधव, शशिकांत जनार्दन सुतार, अरूण हणमंत कोंडी यांचे भूखंड अाहेत.

४१ प्रकरणे विनापरवाना...
^उत्तर तालुक्यात विनापरवाना बिनशेती वापर होत असलेल्या प्रकरणांचा मंडलाधिकारी तलाठी यांनी शोध घेतला. यामध्ये ग्रामीणची २१ तर शहरची २० प्रकरणे आहेत. या प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी हा अहवाल प्रांताधिकारी यांना सादर केला आहे. समाधानशेंडगे, तहसीलदार, उत्तर सोलापूर.

प्रकरण निहाय होणार कारवाई...
^उत्तर तहसीलदारांनी तालुक्यातील विना परवाना असलेल्या बिनशेती प्रकरणांचा अहवाल सादर केला आहे. यावर प्रत्येक प्रकरणनिहाय कारवाई करण्यात येणार आहे. अहवाल सादर झाला आहे, यातील अहवालाची छाननी सुरू आहे. जे नियमबाह्य आहेत, त्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहे. शहाजी पवार, उपविभागीय अधिकारी
बातम्या आणखी आहेत...