आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उजनी’वर ‘दरोडा’, फुलवली शेती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरते उजनी जलवाहिनीतील पाण्यावर ‘दरोडा’ पडत असून तब्बल १५ एमएलडी पाणी रोज चोरी होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. एकूण १२ ठिकाणी पाणी चोरण्यासाठी व्हॉल्व बसवले आहेत. ही करामत काही बहाद्दर शेतकऱ्यांनी केली आहे. त्यांच्या विरोधात महापालिका प्रशासनाने पोलिसांत गुन्हे नोंद केले आहेत.

अतिशय गंभीर बाब म्हणजे हा प्रकार गेले तीन वर्षे सुरू आहे. शहराच्या दहा टक्के भागाला पाणीपुरवठा होईल इतक्या पाण्याची चोरी होत असल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. महापालिका आयुक्तांनी केलेल्या विशेष पाहाणीत ही बाब उघकीस आली.
पथकाने बुधवारी दिवसभर अरण, मोडनिंब, मोहोळ परिसरात शोध घेतला. त्यात तीन इंची व्यासाचे १२ ठिकाणी जोड मिळाले आहे. मोहोळ हद्दीत दोन तर टेंभुर्णी हद्दीत १० आहेत. याप्रकरणी तीन शेतकऱ्यांसह पाच जणांना टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम होते.

तातडीची बैठक :महापालिका अन्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक शासकीय विश्रामगृहात झाली. पोलिस, महसूल प्रशासन यांची पथके सोबत घेण्याचे नियोजन केले.

रात्रीत नियोजन :महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी सुमारे २५० कर्मचाऱ्यांची पाच पथके तयार केली. उपअभियंता दर्जाचे अधिकारी यांच्याकडे पथकांची जबाबदारी िदली.
महापालिका अधिकारी, कर्मचारी, बिगारी, फिटर यांच्यासह जेसीबी, डंपर असा ताफा पथकात होता.
भाजपचीशोधमोहीम : शहरातपाणी टंचाई असताना उजनी जलवाहिनीतून सुमारे १०० ठिकाणांहून पाणी चोरी होत असल्याची बाब भाजपचे शहरध्यक्ष प्रा. निंबर्गी यांनी उपस्थित केली. शोधमोहिमेत नगरसेवक अविनाश पाटील, संजय कोळी, अमर पुदाले, चंद्रकांत रमणशेट्टीसह राजू पाटील, श्रीशैल बनशेट्टी, माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, अनिल भोसले सामील होते.

पाणीपुरवठा विभागातील वाहनचालक काकडे आणि माने हे शेतकऱ्याकडून दरमहा दोन हजार रुपये मासिक हप्ता ठरवून जोड करून देत होते. याची कबुली एका शेतकऱ्याने दिली. वे बॅक कंपनीस यापूर्वी महापालिकेने जलवाहिनी देखभाल दुरुस्तीचा मक्ता दिला होता. नंतर ते बंद केले. त्या कंपनीत काम केलेले गणेश माने हा यातील सूत्रधार असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाण्याचे जोड कोठून दिले याची माहिती या शोधमोहिमेत देत होता. त्यानुसार शोध घेतल्यास तेथे तीन इंची जोड मिळून आले. फिटर किसन कापसे यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पथकातअसा होता फौजफाटा : नगरअभियंता : १, उपअभियंता : ६, सहाय्यक अभियंता : ६, मुख्य लिपिक : ५, कनिष्ठ लिपिक : ५, मजूर : ३०, जेसीबी : ५, फोटो ग्राफर : व्हिडीओ ग्राफर : ३, डंपर : ५, मंजूर : ७०, पोलिस निरीक्षक : २, पोलिस कर्मचारी : १५.

चौकशी करा
शहरपाणीपुरवठ्याबाबत संपूर्ण चौकशी महापालिका आयुक्तांनी करावी. यात महापालिकेचे अधिकारी अडकलेले आहेत.” प्रा.अशोक निंबर्गी, शहरध्यक्ष, भाजप

आणखी शोध घेऊ
शोधमोहीमसुरू राहणार आहे. दाेषींवर अतिशय कठोर कारवाई करण्यात येणार आहे.” विजयकुमारकाळम-पाटील, आयुक्त

सत्ताधारीही पोचले
आयुक्तांनीउजनी जलवाहिनीवरील चोरी शोधण्याची मोहीम सुरू केल्याचे कळताच महापौर प्रा. सुशीला आबुटे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, नगरसेवक बाबा मिस्त्री मोहीम स्थळी दाखल झाले. भाजपचे नगरसेवक पोहचल्याची माहिती मिळताच सत्ताधारीही तेथे पोहचले.

सूत्रधाराचा शोध घ्यावा
महापालिकेच्या पाण्याची चोरी होत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी दोषीवर कडक कारवाई करावी. यातील मुख्य सूत्रधारांचा शोध महापालिका आयुक्त घेतील. शेतकरी पाणी चोरी करत असल्याचे दिसून आले आहे.” प्रा.सुशीला आबुटे, महापौर

मोहीम अशी
तब्बलपाच किलोमीटपर्यंत नेली पाइपलाइन
चोरीच्या पाण्यावर ऊस, डाळींब, फळबागांनी फुलवली शेती आणि व्यवसायासाठी चोरी
मोहोळ ते अरण टोल नाकापर्यंत शोधमोहीम
आयुक्तांची पायपीट, दिवसभर ठाण मांडून
पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवले
अरण परिसरात १० तर मोहाेळ परिसरात ठिकाणी पाण्याची चोरी
फिर्याद देताना मनपा आयुक्त हजर
एका पोलिसाच्या शेतात चोरीचे पाणी

सर्व काही जागेवरच
पाण्याचीचोरी सापडल्यावर पुढील कारवाई जागेवर करण्यात आली. तलाठ्याकडून पंचनामा, पंच, पाइपलाइन गळती दुरुस्ती, पोलिस कारवाई आदी कारवाई जागेवर करण्यात आली.

पाण्याच्या रकमेचा शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर बोजा
चोरलेल्यापाण्याची किंमत काढून संबंधित शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर त्याचा बोजा चढवून महसुली कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्या उताऱ्यावर बोजा चढवण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे. त्यानुसार महसूल विभागाचे तलाठी सर्कल यांनी जागेवरच पंचनामा केला आहे. रकमेची वसुली होणारच असेही स्पष्ट करण्यात आले.

फौजदारी होणार
महापालिकापाणी चोरी प्रकरणी टेंभुर्णी आणि मोहोळ पोलिस ठाण्यात महापालिकेचे अधिकारी फिर्याद देत असून, याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

१५ टक्के भागास पाणीपुरवठा
अनधिकृतजोडमुळे रोज सुमारे १० एमएलडी पाण्याची चोरी होत असल्याचे निष्पन्न झाले. तीन इंची व्यासातून उच्च दाबाने २४ तास पाण्याची चोरी सुरू होती. शहराच्या १५ टक्के भागास रोज पाणीपुरवठा झाला असता. इतकी मोठी चोरी होत असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वेळीच लक्षात आले नाही.


चक्क दोन शेततळी
तीन-चार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चार ते पाच किमीपर्यंत पाइपलाइन करून पाणी घेतले. प्रत्येकी दोन दिवस याप्रमाणे चोरी केलेल्या पाण्याची वाटणी होत असल्याची माहिती पुढे आली.
महापालिकेच्या पाण्यावर दोन ठिकाणी शेततळी भरून घेेण्यात येत असल्याचे दिसून आले. ती कोणाच्या मालकीची शेत आहेत, याबाबत तलाठ्याकडून माहिती घेण्यात येत आहे.