आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर शेतकऱ्यांचा संपावर जाण्याचा विषय चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंदर- शेतमालाला कवडीमोल भाव मिळतोय. पाण्याची श्वाश्वती नाही, शासनाकडून तुटपुंजे अनुदान मिळते. शेतकऱ्यांसमोर मुलांचे शिक्षण, लग्नाच्या अडचणी अशा एक ना अनेक अडचणी त्याच्यासमोर वासून समोर उभ्या आहेत. याला कंटाळून शेवटी तो आत्महत्येचा मार्ग जवळ करतोय. सध्या सोशल मीडियावर शेतकरी कर्जमाफी मिळावी याची चर्चा सुरू आहेत.
 
कर्जमाफीसाठी तरुणाई सध्या आक्रमक झाली आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅपवर आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या नावा-गावासहित त्यांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. त्यादृष्टीने शेतकरी आत्महत्या बंद व्हाव्यात यासाठी तरुणाई आवाहन करत आहेत. येत्या जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अनेक ग्रामपंचायतींनी ठरावही केला आहे.
 
महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी अंदाजे ३० हजार कोटींची आवश्यकता आहे.उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जे केले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार का? अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. यासाठी सोशल मीडियावर तरुण एकत्र येऊन अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत, शैक्षणिक साहित्य अशा स्वरूपाची मदत देऊन इतरांनाही मदतीचे आवाहन करतात. त्यामुळे मदत करणाऱ्याची संख्या वाढतच आहे. सरकारतर्फे शेतकऱ्यांना तोकडी मदत होत आहे. त्यामुळे या मदतीने त्यांचे काहीच होत नाही. यासाठी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची खूप दिवसांपासूनची मागणी आहे. 

शेतकऱ्यांसाठी विरोधकही सक्षम नाहीत. शेतकऱ्यांसाठी अचलपूरचे (अमरावती) अपक्ष आमदार बच्चूभाऊ कडू हे सीएम ते पीएम म्हणजेच नागपूर ते वडनगर(गुजरात) अशी आसूड यात्रा काढली आहे. शेतकऱ्यांत यात खूप चर्चा आहे. ते नेहमीच शेतकऱ्यांसाठी आवाज उठवत आले आहेत. विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न ते आक्रमकपणे मांडतात. तर खासदार राजू शेट्टी यांनीही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. कर्जमाफी या मुद्यावर मुख्यमंत्री यांनी योग्यवेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे सांगितले आहे, पण मुख्यमंत्री महोदय ही वेळ कधी येणार ? असे महाराष्ट्रातील शेतकरी विचारत आहेत. “होय, आम्ही आता शेती सोडतोय. आम्ही नाही पिकवलं तर तुम्ही काय खाणार ? धक्का बसला ना, नका काळजी करू. जमिनीला आम्ही आईसमान मानतो. परवडत नाय तरीही शेती करतो.” अशा पोस्ट व्हायरल केले जात आहेत. 

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात ही आमची मुख्य मागणी आहे. आता संघर्ष करण्याची वेळ निघून गेली आहे. आता शेतकऱ्यांचा कट्टरवाद आणण्याची वेळ आली आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही तर शेतकरी आपल्याला सत्तेतून मुक्त करतील.यासाठी प्रहारचे येत्या 30 पासून आंदोलन करण्यात येणार आहे. 
- बच्चूकडू आमदार संस्थापक प्रहार संघटना 

सद्यस्थितीत शेतकरीअनेक अडचणीत आहे. दुसऱ्या राज्यात कर्जमाफी होते मग महाराष्ट्रात का नाही? आपले सरकार उदासीन का? त्वरित कर्जमाफी होणे गरजेचे आहे.अन्यथा शेतकरी सरकारला अडचणीत आणेल. 
- विजय रुद्राक्ष, शेतकरी, हिसरे, ता. करमाळा
बातम्या आणखी आहेत...