आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीला शेतमाल देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार मताधिकार; पणनमंत्री सुभाष देशमुख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली आहे. समितीमध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश असून, ही समिती ११ मे रोजी शासनाला अहवाल सादर करणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

राज्यात ३०६ बाजार समित्या असून, २०१५-१६ या वर्षात ६५ हजार कोटींची अार्थिक उलाढाल झाली आहे. बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाचा खरेदी-विक्री व्यवहार होत असताना संचालक मंडळामध्ये मात्र शेतकऱ्यांना कोठेही स्थान नाही. बाजार समितीचा शेतकरी हाच प्रमुख कणा असून, त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा कायदा करण्यासाठी समिती अहवाल देणार आहे. या निर्णयामध्ये शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन काही निकष लावून मतदानाचे अधिकार देण्यात येणार आहेत. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सात-बाराधारक शेतकरी अाणि साखर कारखान्यांच्या धर्तीवर जे शेतकरी बाजार समित्यांना शेतमाल पुरवठा करतात, तेच मतदानाचे हक्क बजावतील. यामुळे बाजार समित्यांच्या कामकाजात मोठा बदल होईल, अशी अपेक्षा सहकारमंत्री देशमुख यांनी व्यक्त केली.  

भूविकास बँकेच्या मालमत्ता विकणार 
भूविकासबँकेच्या निवृत्त कर्मचारी कार्यरत कर्मचाऱ्यांची २७० कोटी रुपयांच्या रकमा थकीत आहेत. उच्च न्यायालयात कामगार संघटनांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने अवसायनाच्या कामकाजास स्थगिती दिली आहे. ही याचिका मागे घेण्यासाठी सहकार आयुक्त आणि कर्मचाऱ्यांची बैठक होणार आहे. शिवाय भूविकास बँकेच्या राज्यातील ६० मालमत्ता असून, त्याची विक्री करावी, शेतकऱ्यांकडे थकीत असलेली रक्कमही माफ करण्याबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्यात येईल. 
बातम्या आणखी आहेत...