आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांनो, थेट विका ग्राहकांना कृषिमाल, आठवडा बाजाराचे उद्घाटन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर: शेतकऱ्यांच्या कृषिमालाला योग्य भाव मिळावा, दलाली मध्यस्थीमुळे होणारा त्रास थांबावा यासाठी महाराष्ट्र राज्य पणन मंडळ आणि कृषी विभागाच्या पुढाकाराने राज्यातच शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्यात आले आहेत. सोलापुरातही एक आठवडी बाजाराचे उद्घाटन गुरुवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
 
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विकता यावा. यात दलालांची फळी नसावी, यासाठी बाजाराची व्यवस्था करून देण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांना अापला माल कसा विकावा, विक्री तंत्र कसे असावे? याबद्दल आधी त्यांना विक्रीची माहिती करून देत विक्रीची सोय करण्यात आली आहे. 
 
हा बाजार पहिल्यांदा आठवडी असणार असून आवक आणि प्रतिसादानुसार यात वाढ होईल. केवळ आठवडाच नाही तर परिस्थितीनुसार तो दररोजही भरवता येण्याची शक्यता असल्याचे तालुका कृषी अधिकारी श्रीधर गावंडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी माल विकावा म्हणून ही तात्पुरत्या स्वरूपातील सोय आहे.
 
 माल विकण्याची ही जागा पणनकडून देण्यात आली आहे. शेतकरी आपला माल शहर जिल्ह्यातील ग्राहकांना तसेच यापासून काही उत्पादक करणाऱ्या कंपन्यांनाही विकू शकतो. यासाठी पणन खात्याकडून परवाना देण्यात येणार आहे. 
 
शेतकऱ्यांना माल विक्रीच्या ठिकाणी सावलीसाठी तंबू, इलेक्ट्रॉनिक वजनी काटा आणि स्वत:चा टेबल असणे आवश्यक आहे. दर्जा टिकवावा कृषिमाल ताजा असावा ही बंधनेही आहेत. तसेच व्यसनाधीन माणसांना येथे प्रवेश देण्यात येणार नाही. शेतकऱ्यांनी परिसराची स्वच्छता करणे आवश्यक आहे. 
 
शेतकऱ्याला त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळावा यासाठी राज्य शासनाने शेतकरी आठवडा बाजाराची संकल्पना सुरू केली आहे. दक्षिण सोलापूर तालुका कृषी कार्यालयाच्या आवारात संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडा बाजाराचा प्रारंभ देशमुख यांच्या हस्ते झाला.
 
याप्रसंगी पर्यटन रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, पणन मंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक भास्कर पाटील, माजी आमदार शिवशरण पाटील यांच्यासह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. 
 
वाहनासाठी दोन लाखांचे अनुदान 
- शेतकरी आठवडाबाजारमध्ये शेतकऱ्याला जागेचे भाडे आकारले जाणार नाही. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल शेतकरी गटामार्फत आठवडी बाजार येथे आणण्यासाठी पणन महामंडळामार्फत वाहनासाठी प्रोत्साहन म्हणून दोन लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे.
 सुभाष देशमुख, सहकारमंत्री 
 
बातम्या आणखी आहेत...