आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरसकट कर्जमाफीसाठी सुकाणू समिती सदस्यांची शेतकरी परिषद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - शासनाकडून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी सप्टेंबरला पंढरीत संत तुकाराम भवन येथे सुकाणू समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. 
 
घाटणेकर पाटील म्हणाले की, सुकाणू समितीच्या सरसकट आणि संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीला फाटा देऊन शेतकऱ्यांकडून शासन कर्जमाफीसाठी अर्ज स्वीकारत आहे. १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत आहे. आॅक्टोबरपर्यंत दाखल अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे, असे शासनाकडून सांगितले जात आहे. शासनाच्या या भूमिकेला सुकाणू समितीचा आक्षेप आहे. कर्जमाफीमध्ये घातलेल्या अटी पूर्णपणे काढून टाकल्या पाहिजेत, दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना, नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, अशा मागण्या शासनाकडे करण्यात येणार आहेत. या मागणीसाठी सुकाणू समिती पुन्हा रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे. या संघर्षाची नेमकी दिशा ठरविण्यासाठी सप्टेंबरच्या या परिषदेत चर्चा केली जाणार आहे. परिषदेला सुकाणू समितीचे डॉ. बाबा आढाव. रघुनाथ पाटील, आमदार बच्चू कडू, किशोर ढमाले, छावा संघटनेचे करण गायकर, गणेश जगताप, गणेश कदम, सुशीला मोराळे, बळीराजा संघटनेचे संस्थापक पंजाब पाटील आणि बी.जी.पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. राज्यात अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अद्यापपर्यंत दिली नाही. गळीत हंगाम चालू होण्याअगोदर ज्या साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता दिला नाही त्यांनी ५०० रुपये जाहीर करून त्याचे वाटप करावे. कारखान्याचे वजन काटे आॅनलाइन करणे, साखर विक्री केंद्रीय करणे, येत्या गळीत हंगामामध्ये उसाला किती दराची मागणी करण्याची या बाबतची परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे. या पत्रकार परिषदेच्या वेळी माउली हळणवर, संतोष सुळे आदीसंह इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
निपटारा चार्जेस रद्द करावेत 
राज्यशासनाने दुधाला २७ रुपये लिटरला भाव देण्याची १९ जून २०१७ रोजी घोषणा केली. अद्याप दुधाला दर दिलाच नाही. सोलापूर जिल्हा दूध संघ शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दुधाला २७ रुपये लिटर दर देण्याचे नाटक करीत आहेत. कारण या संघाकडून दूध उत्पादक सभासदांना २७ रुपये दर देऊन त्या मधून रुपये निपटारा चार्ज म्हणून कपात केली जात आहे. गेल्या दोन, तीन महिन्यांमध्ये अशा प्रकारे निपटारा चार्जेस पोटी संघाने ते कोटी रुपये रक्कम कपात केलेली आहे. त्यामुळे दुधाला विनाकपात २७ रुपये दर देऊन निपटारा चार्जेस आकारणी विजयादशमीपर्यंत त्यांनी शेतकरयांना परत करावी अन्यथा आंदोलन करू असेही संजय पाटील यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...