आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ दिवसांत दुसरे आवर्तन द्या, अन्यथा अधिकाऱ्यांना अद्दल घडवू; शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज- नीरा कालव्यातून माळशिरस तालुक्याला उन्हाळी हंगामात दिलेल्या पाणीप्रश्नी जलसंपदा खात्याने येत्या आठ दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा बेजबाबदार अधिकाऱ्यांना अद्दल घडवू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांचा संयम सुटून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासनाच जबाबदार असेल, असेही शेतकऱ्यांनी म्हटले. नीरा कालव्यातून उन्हाळी हंगामाचे दुसरे आवर्तन मिळाल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २९) माळशिरस तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. 
 
आमदार हनुमंत डोळस, धैर्यशील मोहिते, सभापती वैष्णवीदेवी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर हा मोर्चा निघाला. आमदार डोळस म्हणाले, जलसंपदामंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या निर्णयास फलटणचे कार्यकारी अभियंता यू. व्ही. सिधमल, माळशिरसचे उपभियंता दत्तात्रय पवार यांनी केराची टोपली दाखवली आहे. इतर तालुक्यांना चार हजार क्युसेक पाणी ज्यादा देऊन त्यांनी माळशिरसवर अन्याय केला आहे. या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी, यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री जलसंपदामंत्र्यांना भेटणार आहोत. 
 
धैर्यशील मोहिते म्हणाले, उपअभियंता पवार यांची भूमिका माळशिरस तालुक्याच्या विरोधी आहे. उपभियंता पवार कार्यकारी अभियंता सिधमल यांनी पाणी देण्यासाठी आर्थिक गैरप्रकार केला आहे. आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या नाही तर दंडुका हातात घेऊ, असा खणखणीत इशाराही त्यांनी तहसीलदार बी.एस.माने पोलिस प्रशासनासमोर दिला. ममाळशिरस तालुक्यासाठी धर्मपुरी ते तांदूळवाडीपर्यंत एकच उपविभाग असावा, असे शहाजी देशमुख म्हणाले. 
 
शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, असे सदस्य बाळासाहेब धाईंजे म्हणाले. जलसंपदा खात्याच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, अशी भीती अॅड. प्रकाश पाटील यांनी व्यक्त केली. मोर्चेकरांच्या भावना तत्काळ मुख्यमंत्री जलसंपदा खात्यास कळवू , असे तहसीलदार बी. एस. माने यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर सांगितले. या मोर्चास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, मदनसिंह मोहिते,फत्तेसिंह माने,उपनगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख, अॅड. प्रकाश पाटील, झेडपी सदस्या शीतलदेवी मोहिते, स्वरूपाराणी मोहिते, सदस्य बाळासाहेब धाईंजे, किशोर सिंहमाने, उप सभापती किशोर सुळ, फातिमा पाटावाला आदी उपस्थित होते. 
 
पालकमंत्र्यांनी काय साधले? 
पालकमंत्रीविजयकुमार देशमुख यांनी माळशिरस येथे आढावा बैठक घेऊन काय साधले, असा प्रश्न आमदार हनुमंत डोळस यांनी उपस्थित केला. पाणी वाटपाचे वाटोळे झाले. पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यानतंर टँकर सुरू झाले.आढावा बैठकीचे फलित काहीही निघाले नसल्याची टीका डोळस यांनी केली. 
बातम्या आणखी आहेत...