आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीचा ताबा मिळत नसल्याने शेतकऱ्याचा कुटुंबासह आत्महत्येचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकरी साहेबराव काळे. - Divya Marathi
शेतकरी साहेबराव काळे.
सोलापूर (माढा)- उजनी धरणाच्या निर्मितीला जवळपास 45 वर्षांचा कालावधी लोटला आहे. या धरणासाठी जमीन दिलेल्या एका शेतकऱ्याच्या जागेत दुसऱ्या शेतकऱ्याने अतिक्रमण केले असून तो शेतकरी जमिनीचा ताबा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे आता धरणग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्येचा इशारा दिला आहे. 
 
धरण बांधताना 22 एकर शेतजमिनीचे क्षेत्र जाऊन विस्थापित झालेल्या माढा तालुक्यातील सुर्ली येथील साहेबराव वामन काळे या शेतकऱ्याने कुटूंबियांसह उजनी धरणात 20 ऑक्टोबर रोजी सकाळी उडी मारुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. काळे यांची वडिलोपार्जित 22 एकर शेती ही धरण बांधणीवेळेस धरणात गेली. या बदल्यात त्यांना शासनाकडून बेंबळे (ता. माढा) गावात 4 एकर शेती व राहण्यासाठी 2 हजार चौ.मी.चा प्लॉट मिळाला आहे. मात्र त्याचा ताबा अजुन त्यांना मिळालेला नाही. शासनाने दिलेल्या जागेत अर्थात पुनर्वसन भागात 
एका व्यक्तीने अतिक्रमण करुन रस्ताच स्वत: ताब्यात घेत अडवुन ठेवला असल्याचे काळे यांचे म्हणणे आहे. याची लेखी तक्रार ते प्रशासनाकडे गेल्या 15 वर्षांपासून करीत आहेत. मात्र शासनाने याची दखल न घेतल्याने त्यांनी कुटूबिंयासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी  मुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक सोलापुर, माढा तहसीलदार यांना दिले आहे. 
 
माढाचे तहसीलदार सदाशिव पडदुणे याबाबत म्हणाले की, या शेतकऱ्याने अगोदर 138 ची केस प्रशासनाकडे दाखल करावी. त्यानंतर प्रशासन तक्रारदार व पक्षकाराची बाजु ऐकुन घेऊन निर्णय देईल. त्यानंतर मोजणी अधिकारी जागेची मोजणी करुन जागा वाटप करतील. ही अशी प्रक्रिया आहे. ती या शेतकऱ्याने लक्षात घ्यायला हवी. या शेतकऱ्याचे निवेदन माझ्याकडे आले असुन पोलिसांना शेतकऱ्याकडे पाठवले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...