आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या घामाचा पैसा का‌ मिळेना, शेतकऱ्यांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - घामगाळून पिकवलेल्या पिकाच्या पट्टीचेही पैसे आम्हाला मिळेनात, आम्ही कष्ट करून मिळवलेला पैसा शासनाच्या बापाचा आहे काय, असा संतप्त सवाल विचारत शेतकरी अाणि काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. पोलिसांनी सर्वांना गेटजवळ अडवल्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय घोषणांमुळे दणाणून गेले होते. 
 
केंद्र शासनाने नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर ग्रामीण शहरीही अंतर्गत अर्थव्यवस्था कोलमडून पडल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने केला जात आहे. यामुळे आठवड्यापासून विविध आंदोलने जिल्ह्यात केली जात आहेत. शुक्रवारी (दि. ६) जिल्हाधिकाऱ्यांना येथे घेराव घालण्याचे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. दुपारी एकच्या सुमारास जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानापासून रॅली काढण्यात आली. यामध्ये हातात फलक घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाली होते. आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, माजी उपाध्यक्ष संजय दुधगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, उपाध्यक्ष सत्तार शेख, मधुकर तावडे, राजाभाऊ शेरखाने, बाबूराव राठोड आदींनींसह शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. तेथे सुरुवातीच्या गेट मधून आत शिरले. सर्वजण जिल्हाधिकाऱ्याच्या दालनात जाण्यासाठी इमारतीच्या गेटमधून आता घुसण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी यावेळी सर्वांना अडवून धरले. इमारतीचे सर्व गेट बंद करण्यात आले. यावेळी पोलिस आंदोलकात शाब्दिक खडाजंगी झाली. १२ कार्यकर्त्यांना आत सोडण्यात आले. मात्र, आमदार चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरावो घालण्यासाठी त्यांनाच खाली येण्याचे फर्माण सोडले. मात्र, जिल्हाधिकारी खाली येत नसल्याचे पाहून बंद गेटला निवेदन डकवून आवारात ठिय्या मारण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्य भाजप नेत्यांच्या विरोधात तसेच शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले होते. 

पट्ट्या दाखवल्या 
आठवड्यापूर्वी शेतकऱ्यांनी माल आडतीवर घातला. अडीच लाखांपर्यंतची पट्टी बँकेत जमा झाली होती. मात्र, मराठवाडा बँकेतून चलन तुटवड्याच्या नावाखाली रक्कम देण्यास टाळल्याचे शेतकरी गजेंद्र मारकडे यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना आपल्या पट्ट्या दाखवून शासनाच्या धोरणाचा निषेध केला. 

तुळजापूर येथे मोर्चा 
तुळजापूर।काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शैलेश पाटील चाकुरकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे कार्यालयाला घेरावो घालण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी कारण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष सिद्रामप्पा मुळे, सभापती प्रकाश चव्हाण, नगरसेवक सचिन पाटील, मुंकुद डोंगरे, काशीनाथ बंडगर, नगरसेवक अमर मगर, दिलीप सोमवंशी, रणजित इंगळे, आनंद जगताप, माऊली भोसले, अमोल कुतवळ, लखन पेंदे, भारत कदम, हरिष जाधव, विजय गायकवाड, डाॅ. राजलक्ष्मी गायकवाड, अशोक पाटील, दिलीप डोलारे, चंदू बनसोडे यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

कळंबला निदर्शने 
कळंब येथे केंद्र सरकारविरोधात निर्दशने करण्यात आली. नागरीकांना स्वत:चे पैसे घेण्यासाठीही बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करुन निदर्शने करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष संजय घोगरे, अनंत लंगडे, भागवतराव धस, अॅड. त्रिंबक मनगीरे आदी उपस्थित होते.
 
परंड्यात निवेदन 
परंडा येथे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन देऊन सर्व प्रकारचे चलन बँकेत उपलब्ध करा, काँगेस पक्षाच्या वतीने सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष ॲड. श्रीकांत भालेराव, ॲड. दादासाहेब खरसडे, ॲड. नुरोद्दीन चौधरी, प्रा.मधुकर पाटील आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

प्रथमच ताकद 
आंदोलनासाठी काँग्रेसने खूप दिवसांनी प्रथमच मोठी शक्ती आंदोलनासाठी लावली होती. ग्रामीण भागातून कार्यकर्ते शेतकऱ्यांना आंदोलनासाठी बोलाविण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. पाटील यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ सर्वांना जमा होण्यास सांगण्यात आले होते. या सर्व प्रयत्नामुळे आंदोलनाला यश आले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...