आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीत बेदाण्यासह मसाल्याचे व्यवहार सुरू करा, सुशीलकुमार शिंदे यांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पूर्वीकांद्याची बाजारपेठ म्हटलं तर लासलगावचं नाव घेतलं जायचं, पण आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्यासाठीची राज्यातील क्रमांक एकची बाजार समिती झाली आहे. आता कांदा, ज्वारी बेदाण्याबरोबर मसाल्याचे व्यवहारही सुरू करावेत. कारण सोलापुरात पोषक वातावरण आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केले.
सोलापूर बाजार समितीच्या आवारात सहकारमहर्षी ब्रह्मदेव माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

मंचावर महापौर प्रा. सुशीला आबुटे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष जयमाला गायकवाड, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आनंदराव देवकते, मधुकरराव चव्हाण, आमदार प्रणिती शिंदे, सिद्धाराम म्हेत्रे, भारत भालके, हणमंतराव डोळस यांच्यासह जयकुमार मोरे, माजी आमदार सदाभाऊ पाटील, रश्मी बागल, महादेव चाकोते, बळीराम साठे आदी होते.

श्री. शिंदे पुढे म्हणाले की, वि. गु. शविदारे, बाबूराव चाकोते आणि दादा या त्रिमूर्तींमुळेच बाजार समितीने इतिहास घडवला. देशातील आदर्श बाजार समितीत सोलापूरचा नामोल्लेख करता येईल. महाराष्ट्रात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. यापूर्वीही अनेकदा दुष्काळ पडलेला होता. त्यावेळी आम्ही जनतेसाठी सरकारी तिजोऱ्या मोकळ्या केल्या. वीजबिलाचे कोटी शेतीकर्जे माफ केली होती. दहशतवादी हल्ल्यांबाबत शिंदे म्हणाले की, देशात हल्ले कुणाच्या राजवटीत झालेत हे तुम्ही जाणता. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे आणि "अच्छे दिन'चा नारा लागत आहे.

या वेळी दक्षिण पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, बाजार समितीतील आठही संघाचे पदाधिकारी, संचालक मंडळ, आडते, व्यापारी शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. आभार नसीर अहमद खलिफा यांनी मानले.


दादांचे नाव कायम चर्चेत असे : विजयसिंह मोहिते
१९८५मध्ये मी मंत्री असताना दादांचे नाव कायम चर्चेत असायचे, मला ते नेहमीच मार्गदर्शन करायचे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे.
मंचावर बाबूराव चाकोते, वि. गु. शिवदारे, भीमराव वडकबाळकर ब्रह्मदेव माने यांच्या प्रतिमा होत्या.
दादा गप्प राहिले नसते : देशमुख

दादांचीकारकीर्द सरपंच म्हणून सुरुवात झाली. ‘डीसीसी’ बँक शेतकऱ्यांची बँक म्हणून नावारूपाला आणली. या अधविेशनातही दुष्काळावर केवळ चर्चा झाली. पण हे राज्य केंद्र सरकार सकारात्मक नाही. आता जर दादा असते तर या प्रश्नांवर ते गप्प राहिले नसते.

दादा शेवटपर्यंत झटले : परिचारक
जवळपास ४० ते ५० वर्षे दादा मी एकत्र काम केले. १९६५ पासून आम्ही ‘डीसीसी’ बँकेत मिळून होतो. १९६७ मध्ये कुमठ्यात एक खून झाला. त्यात दादांना विनाकारण गोवण्यात आले. तसेच त्यांच्यावर एकदा दुचाकीवरून जाताना शस्त्राने ४० वार झाले. ते शेवटपर्यंत जनतेसाठी झटले.

माने झाले भावुक
सभापतीदिलीप माने यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, वडिलांचे निधनही एका आंदोलनावेळी झाले, यावरून त्यांची समाजाप्रती शेतकऱ्यांप्रती काय भावना होती, हे समजते. दादांचे सहकारी त्यांच्या पश्चात माझ्या पाठीशी उभे राहिले, ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. हे बोलत असताना माने गहिरवले होते. भाषणानंतर हर्षवर्धन पाटील यांनी माने यांच्या पाठीवर हात फिरवला.

माणसाचा नेम नाही
सोलापुरातबोटावर मोजण्याइतकी चांगली माणसे राजकारणात उरली आहेत, येथे जपून पावले टाकावीत. जवळचा माणूस काय करेल याचा नेम नसतो, असे शिंदे म्हणाले.

सहकारमहर्षी ब्रह्मदेव माने यांच्या पुतळा अनावरणावेळी हर्षवर्धन पाटील, विजयकुमार देशमुख, राधाकृष्ण विखे-पाटील, सुशीलकुमार शिंदे, सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने, गणपतराव देशमुख, पतंगराव कदम, सुशीला आबुटे आदी.

पतंगराव कदमांनी दिला मानेंना सल्ला
दिलीपलातिकीट देण्यात माझा काहीही ‘रोल’ नाही. देणारे-घेणारे सुशीलकुमार शिंदेच आहेत. दादा हयात असताना दिलीप आमदार झाला नाही ही खंत आहे. पक्षात ज्येष्ठ लोक सुधरू देत नाहीत. पण दिलीपला एक सल्ला देतो, ‘गाढवाच्या मागे आणि नेत्याच्या पुढे उभे राहू नये.’
बातम्या आणखी आहेत...