आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेथीसह शेपा, कोथिंबीर स्वस्त, बटाटे, टोमॅटोही आवाक्यात; उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - एकीकडे दुष्काळाची तीव्रता वाढत असताना बाजारपेठेत शेतमालाची आवक घटली आहे. केवळ अल्प पाण्यावर शेतात पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी येत आहेत. परंतु भाजीपाल्याचे दर कमालीचे खाली आले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडत आहे.

ऑगस्ट महिना संपत आला तरी यावर्षी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतीचे अर्थकारण कोलमडून गेले आहे. पाणी नसल्याने खरिपाची पिके घेता आली नाहीत. त्यामुळे रानभाज्यांचीही उगवण झाली नाही. शेतात पावसाच्या पाण्यावर भाजीपाल्याची लागवडही होऊ शकली नाही. किंवा नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या भाज्यांचाही अभाव आहे. मात्र, असे असले तरी शेतकऱ्यांनी द्राक्षबाग, केळी, डाळिंब, मोसंबी अशी फळपिके मोडून अल्प पाण्यावर भाजीपाल्याची शेती फुलविली आहे. या शेतीतला भाजीपाला बाजारात आल्यामुळे आवक वाढली असून, दर मात्र कोलमडले आहेत. भाव पडल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही पदरात पडत नाही. त्यामुळे दुष्काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. भाव कोसळल्याने येण्या-जाण्याचा प्रवास खर्चही निघत नाही. मजुरी, मेहनत, पाणी, बियाणे, खते, नफा याचा तर मेळ लागणेही मुश्किल झाले आहे, असे शेतकरी सांगतात. उस्मानाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दीड महिन्यापासून भाजीपाल्याचे दर अत्यंत कमी झाले आहेत. दोन दिवसांपासून त्यात आणखी घसरण झाली आहे. त्यामध्ये कोथिंबीर रुपये ७० पैसे ते रुपये जुडी, मेथी ते रुपये ७५ पैसे जुडी, शेपा ते साडेतीन रुपये जुडीप्रमाणे विकली गेली. भेंडी २० , गवार १० ते १५, टाेमॅटो ते १०, काकडी १० ते १३, कारले १० ते २५ रुपये किलो दराने विक्री झाले.

कांद्याने गाठली पन्नाशी
भाजीपालास्वस्त होत असला तरी कांद्याचे भाव दिवसाला वाढत आहेत. बुधवारी उस्मानाबादच्या बाजार समितीमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल हजार रुपये दर मिळाला. सामान्यांना ५० रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकत घ्यावा लागत आहे. आगामी काळात कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
^भाज्यांच्या दरामध्ये इतकी मोठी घसरण झालेली असतानाही यावर शहरी भागात गंभीरपूर्वक चर्चा होत नाही. शासनालाही याविषयावर गांभीर्य वाटत नाही. मात्र, कांद्याचे भाव वाढू लागले की सगळीकडेच चर्चेला सुरुवात झाली आहे. एका वस्तूचे भाव वाढल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या अन्य उत्पादनासाठी होतो का, याचाही विचार करणे गरजेचे आहे.'' हनुमंत पाटील, शेतकरी,
भानसगाव

भाववाढ झाल्यानंतरच ओरड
भाज्यांच्यादरमध्ये किंचित वाढ झाली तरी सर्वत्र ओरड सुरू होते. मात्र, भाव घसरल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने कोणीही पुढे येत नाही, ही खरी शोकांतिका आहे, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत. पावसाअभावी यावर्षी बाजारपेठेत मालाची आवक होऊ शकली नाही. त्यामुळे धान्याची बाजारपेठ थंडच आहे. पण काही शेतकऱ्यांनी अल्पशा पाण्यावर पोसलेला भाजीपाला कवडीमोल दराने विकावा लागत आहे.