आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळढोकप्रश्नी प्रसंगी सरकारविरुद्ध भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर सोलापूर - ‘सदैव माळढोकग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. प्रसंगी सरकारविरोधी भूमिका घ्यावी लागली तरी घेऊ’, असे जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी येथे सांगितले. शनिवारी पुनर्गठित माळढोक अभयारण्य इको सेन्सेटिव्ह झोनसंदर्भात माळढोक बचाव - शेतकरी बचाव समितीतर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
श्री. देशमुख म्हणाले, ‘आपण कायद्याच्या चौकटीत राहून लवकर हा प्रश्न सोडवू. अधिकाऱ्यांची सहकार्याची भूमिका हवी.

उपवनसंरक्षक सुभाष बडवे यांनी इकोसेन्सेटिव्ह झोनची गरज मांडली. जेवढ्या लवकर हा प्रश्न मार्गी लागेल तेवढ्या लवकर इतर क्षेत्रासह खरेदी-विक्रीवरील बंधने कमी होतील असे ते म्हणाले. अहमदनगरचे वनसंरक्षक शिवाजी पटांगरे यांनी इकोसेन्सेटिव्ह झोन नगर पॅर्टनची माहिती दिली.

यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादीचे नेते बळीराम साठे, चेंबर ऑफ कामर्सचे राजू राठी सहाय्यक वनसंरक्षक पुणे बापूसाहेब येळ्ळे, शिवाजी पटांगरे, संशोधक सुजित नरवडे मंचावर होते.
कोण काय म्हणाले
^अधिकारीपंढरपुरातएका वारकऱ्याला तीन वर्गफूट जागा सांगतात तर इकडे तीन माळढोकसाठी लाख वर्गमीटर जागा संरक्षित करतात. ही पद्धत चुकीची आहे.” विजयकुमार देशमुख, पालकमंत्री

^एका जिल्हाधिकाऱ्यानेस्वअधिकारात आठ हजार एकर क्षेत्र वाटप केले. तेव्हा वन विभाग झोपला होता का? लक्ष्मण ढोबळे, माजीमंत्री

^सर्वसंमतीने प्रश्नहाताळला तरच यातून लवकर मार्ग निघेल. झोनमधील शेतकऱ्यांना सरकारकडून कायम अर्थसाहाय्य मिळवून देण्याचाही प्रयत्न आहे.” सुभाष बडवे, उपवनसंरक्षक

^माळढोक पक्षीअभयारण्य आमच्या तालुक्याचे वैभव आहे. परंतु त्यांच्या नावावर आमचा विकास थांबला आहे. त्याला आम्ही विरोध करू. बळीराम साठे, नेते,राष्ट्रवादी काँग्रेस

^आधी जकात,नंतर एलबीटी, मंदी, दुष्काळ यामुळे सोलापूरचा विकास खुंटला आहे. त्यातच माळढोक अभयारण्यामुळे आणखी मागे पडण्याची शक्यता आहे.” बाबूभाई मेहता, उद्योजक,सोलापूर