आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा, छावण्या नाहीत नसल्‍यामुळे शेतकरी दुभती जनावरे विकताहेत कसायांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैराग - वैरागयेथील जनावरांचा आठवडा बाजार चांगला दर मिळत असल्यामुळे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दुष्काळी स्थितीमुळे ग्राहकांकडून दुभत्या जनावरांना मागणी कमी झाली आहे. तसेच, दर ही पाडून मागितले जात आहेत. त्यामुळे शेतकरी नाईलाजाने आपली जनावरे चांगला दर देणाऱ्या कसायास विकत आहेत. त्यामुळे भविष्यात पशुधन मोठ्या प्रमाणात कमी होण्याची धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

सांगाेला, माढा, माेहोळ, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर येथून खरेदी- विक्रीसाठी जनावरे मोठ्या प्रमाणात येत असतात. दुभत्या जनावरांमध्ये म्हैस, गाय, शेळी, बैलांचा मोठा बाजार येथे भरतो. सध्या दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी जनावरे विक्रीसाठी आणत आहे. मागणी नसल्याने ते जनावरे कत्तलखान्याकडे विक्री होताना दिसत आहे. कसाई अधिक दर देत असल्याने प्रेमाने सांभाळलेली जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कत्तलखान्याकडे जाणाऱ्याजनावरांना प्रतिबंध करण्यासाठी प्रथम चारा निर्माण करणे, विविध मार्गावर नाकेबंदी करणे गरजेचे आहे. अन्यथा पशुधनात मोठी घसरण होईल.” डॉ. श्रीहरी शिंगारे, पशुवैद्यकीय अधिकारी

दुष्काळी स्थितीमुळेचांगल्या जनावरांनासुद्धा योग्य किंमत मिळत नाही. शेतकऱ्यांकडून मागणी नसल्यामुळे दरही मोठ्याप्रमाणात घसरले आहेत. बाजारात मंदी जाणवत आहे. संतोष देवकर, व्यापारी

जनावरांसाठी छावण्यानिघतील असे वाटले होते. शेतातही चारा नाही. जनावरे सांभाळायची कशी. त्यामुळे इच्छा नसताना जनावरांची कसायास विक्री करावी लागत आहे.” कुमार पौळ, शेतकरी

दुष्काळी स्थितीमुळेशेतात पीक नाही, जनावरांच्या चाऱ्याची आत्ताच गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पुढच्या पाच महिन्यांची चिंता आहे. जनावरे सांभाळणे अवघड झाले आहे.” रावसाहेब पवार, शेतकरी
बातम्या आणखी आहेत...