आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिक पाण्याअभावी जळु लागल्याने नैराश्यापोटी शेतकऱ्याची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा (सोलापुर)- ऊस पिक पाण्याअभावी जळुन जाऊ लागल्याने व शेतातील बोअर कोरडे पडल्याने नैराश्यापोटी शेतकऱ्याने ऊसाच्या शेतातच विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना माढा तालुक्यातील ढवळस गावात घडली आहे.

 

मधुकर कर्ण ढवळे (वय 47, रा. ढवळस) असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 
ढवळे यांना दोन एकर जमीन आहे. यापैकी त्यांनी यावर्षी दिड एकर क्षेत्रावर ऊसाची लागवड केली होती. ढवळे यांनी शेतात घेतलेली बोअर ही कोरडी पडली होती. बोअरमधली जुनी विद्युत  मोटार काढुन ती बदलण्यासाठी नविन मोटार ढवळे यानी बाजारातुन खरेदी केली होती. मात्र ती बोअरमध्येच अडकली होती. दुसरी मोटार टाकली गेली. ती सुध्दा बोअरमध्ये अडकली. दोन्ही  ही मोटार बोअरमध्येच अडकल्या. त्यातच उसाला  पाणी मिळाले नसल्याने ऊस जळुन जाऊ लागल्याने व आर्थिक चणचणीमुळे ढवळे हे मानसिक तणावाखाली होते. त्यांनी नैराश्यापोटी दि. 20 नोव्हेबरला सोमवारी रात्री उशीरा स्वत:च्या ऊसाच्या शेतात जाऊन विष प्राशन केले. याची माहिती मिळताच ढवळेच्या नातेवाईकांनी बार्शी येथील सुविधा हाॅस्पीटलमध्ये उपचारास नेले होते.

 

उपचारादरम्यान मधुकर ढवळे यांचा 21 नोव्हेंबर रोजी (मंगळवारी) सकाळी 7 च्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद अद्याप कोणी दिली नसुन याची नोंद कुर्डूवाडी  पोलिसांत झाली नसल्याचे स.पो.नि. ईश्वर ओमासे यांनी सांगितले. तर बार्शी पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी कुर्डूवाडी पोलिसांना या बाबतची कागदपत्रे कालच पाठवली असल्याचे सांगितले. मधुकर ढवळे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...