आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ महिन्यांच्या चिमुकलीचा पित्याकडून खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील अशोक चौक परिसरातील एका इमारतीत मंगळवारी सकाळी एका ८ ते १० महिन्यांच्या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. याच इमारतीत मजूरकाम करणाऱ्या इमाम सय्यद यानेच आपल्या मुलीचा खून केला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सकाळी इमारतीचे वॉचमन पाणी मारण्यासाठी छतावर आले असता हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आरोपी इमाम फरार झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, इमाम सय्यद हा याच इमारतीत मजुरीची कामे करतो. घटनेच्या दिवशी कामावर गैरहजर होता. त्याची पत्नी रुक्साना व मुलगी मझबाह आणि सासूसह तो कुंभारी येथे भाड्याने राहत होता. २० ऑक्टोबरच्या रात्री १२ च्या सुमारास इमामने दारूच्या नशेत पत्नीसोबत भांडण केले. तसेच रागाच्या भरात व नशेतच मुलगी मिझबाह हिस घटनास्थळी आणून मारले असावे, असा पोलिसांना संशय होता. त्याला मध्यरात्री इमारतीतून पळून जाताना वॉचमनने पाहिले आहे.

अवघ्या १० तासांत या प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, आरोपी इमाम हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.