आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: हॉर्न वाजवल्‍यावरुन बापलेकास मारहाण, वडीलांचा मृत्‍यू; खूनाचा व अॅट्रोसिटीचा गुन्‍हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत गौतम नामदेव ओहोळ (रा.सापटणे भोसे, ता. माढा, वय 65) - Divya Marathi
मृत गौतम नामदेव ओहोळ (रा.सापटणे भोसे, ता. माढा, वय 65)

माढा (सोलापुर) - गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन बापलेकास जातीय शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना माढा तालुक्यातील सापटणे (भोसे) येथे मंगळवारी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली होती. यावेळी मारहाण झालेल्‍या गौतम नामदेव ओहोळ (रा.सापटणे भोसे, ता. माढा, वय 65) यांचा उपचारादरम्यान आज गुरुवारी मृत्यु झाला आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात माढा पोलिस स्‍टेशनमध्‍ये खूनाचा व अॅट्रोसिटीचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झालेले असून पोलिस त्‍यांचा शोध घेत आहे.

 

याबाबत माढा पोलिसांकडे दाखल करण्‍यात आलेल्‍या तक्रारीनूसार, करण गौतम ओहोळ (वय 19 ) हा गावातून दुचाकीवर जात होता. तेव्‍हा हॉर्न वाजवण्‍याच्‍या कारणावरुन त्‍याला जातीय वाचक शिवीगाळ करण्‍यात आली व लाथाबुक्यानी मारहाण केली गेली. मुलाला वाचवण्‍यासाठी वडील गौतम नामदेव ओहोळ यांनी हस्‍तक्षेप केला असता त्‍यांनाही जबर मारहाण करण्‍यात आली. मारहाणीत वडील गौतम ओहोळ यांना गंभीर इजा झाल्‍याने त्यांना सोलापुर येथील सिव्‍हील रुग्णालयात मंगळवारी रात्री नेण्यात आले होते.


मात्र गौतम यांचा आज गुरुवारी उपचारादरमायन मृत्यु झाला आहे. तर त्‍यांचा मुलगा करण गौतम ओहोळ याची प्रकृती आता ठिक असल्‍याची माहिती आहे. मुलगा करण याने याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून सापटणे (भोसे) येथील सोमनाथ एकनाथ लाड, हनुमंत एकनाथ लाड, बालाजी रघुनाथ सावंत या तिघांविरोधात खुनाचा व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे यानी जखमीची भेट घेतली असून सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोस आरोपीचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...