आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. अरुणा ढेरे, सिंधुताई यांचा फडकुले पुरस्काराने सन्मान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंधुताई सपकाळ यांना पुरस्काराने सन्मानित करताना ज्येेष्ठ अभिनेत्री फय्याज इतर. - Divya Marathi
सिंधुताई सपकाळ यांना पुरस्काराने सन्मानित करताना ज्येेष्ठ अभिनेत्री फय्याज इतर.
सोलापूर - आजचा सत्कार म्हणजे एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा केलेला गौरव आहे. सिंधुताई अरुणाताई या दोघींचेही काम मोठे आहे. सिंधुताईंची जडणघडण वेदनेतून झाली आहे. वेदना ही जगायला शिकवते. मग ती स्त्री असो की पुरुष. साहित्यिक असो की कवी. वेदना मनात रुजल्यानंतर संवेदना जागी होते. यातूनच इच्छाशक्तीच्या पंखांना बळ मिळून भरारी घेतली जाते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री फय्याज यांनी केले.

डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान, संभाजीराव शिंदे विद्यामंदिर सुशील रसिक सभा आयोजित ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी सायंकाळी डॉ. फडकुले सभागृहात साहित्य सेवा समाजसेवा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. त्यावेळी ज्येेष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांना साहित्य सेवा पुरस्काराने तर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री फय्याज होत्या. व्यासपीठावर प्रसिद्ध वात्रटीकाकार रामदास फुटाणे, सुविद्या प्रकाशनचे बाबूराव मैंदगीकर, दत्ता गायकवाड रविकिरण पोरे आदी उपस्थित होते. रामदास फुटाणे यांंनी प्रास्ताविक केले. ममता बोल्ली यांनी सूत्रसंचालन केले.
सिंधुताई सपकाळ यांनी केले मार्गदर्शन
स्त्रियांना उद्देशून सिंधुताई म्हणाल्या, मन समर्थ करा वाट पाहू नका. साहित्याचा संस्कार करायचा आहे. लेखन पूर्ण करायचे आहे. काना, मात्रा सुधारायच्या आहेत. रात्रीनंतर रोजच दिवस उगवत असतो. त्यासाठी एका रात्रीची वाट पाहा. फुलांच्या पायघड्याावरून चालताना काटे बोचतील. आयुष्यात तेही सहन करण्याची तयारी ठेवा. मगच तुम्ही माऊली व्हाल. आईचं काळीज आभाळाएवढं असतं. तिची काळजी घ्या, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
फय्याज म्हणाल्या सध्या समाज मी पणाच्या गर्तेत अडकला आहे. त्यांना इतरांचा विसर पडलाय. सिंधुताई मी पणाच्या गर्तेतून बाहेर पडल्या अन् त्या जगाच्या आई बनल्या.त्यांचा आदिवासींना मायेचा स्पर्श घडलाय. मनावरील आघात सोसत सोसत त्या मोठ्या बनल्या. मनावर आघात झाल्यानंतरच कला फुलत असते. अरुणा ढेरे यांचे लिखाण वाङ््मयातील प्रत्येक प्रकाराला स्पर्श करणारे आहे. त्यांच्या लिखाणातून स्त्री मनं उलगडत गेले आहे.
डॉ. अरुणा ढेरे
सोलापूरहे शहर भावनिकदृष्ट्या माझ्याशी जोडलेलं आहे. इतिहासाची सावली सोलापूरवर आहे. आज पुरस्कार स्वीकारताना मला सोलापुरातील अनेक कवी, साहित्यिक आठवतात. आयुष्याच्या मध्य बिंदूपासून मी पुढे सरकत आहे. इतिहास नाकारणाऱ्यांच्या पिढीत माझा ज्म झाला नाही, याचा आनंद आहे. आई-वडिलांकडून माझ्यावर माणसांशी बांधून ठेवण्याचे संस्कार झाले आहेत. आज समाजात स्पर्धात्मक विषारी परिस्थिती निर्माण होत आहे. विधायक गोष्टीसाठी लेखकांनी, कवींनी सृजनतेचे लिखाण करायला हवे. सृजनतेच्या लिखाणातून विधायक परिस्थिती तयार होईल. आयुष्य थांबत नाही. त्याची नांगरणी पेरणी करावीच लागते.
अन् कट्यार काळजात घुसली : फय्याजआपले अध्यक्षीय भाषण करत असतानाच सिंधुताईंनी त्यांना मध्येच रोखलं. त्यांना एखादे गाणे सादर करण्याची विनंती केली. त्यावेळी फय्याज यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकातील सांवरिया नैना हो गई हे गाणं सादर केलं अन् प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडात त्याला साद दिली.