साेलापूर - एखाद्या महिलेने विनयभंग, मानभंग किंवा काही आरोप केले तरी तथ्य शोधण्याच्या प्रक्रियेला सामान्यत: ९० दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र विद्यापीठातील एका महिलेने पोलिसांत तक्रार केली. विद्यापीठाकडे केली. महिला आयोगाचे दरवाजे ठोठावले. याला चार महिने होत आले. तरी विद्यापीठ सत्य शोधू शकलेले नाही. विद्यापीठाने पहिल्या समितीने दिलेला अहवाल बासनात बांधून ठेवत दुसरी समिती नेमली. या समितीकडून महिना अखेरपर्यंत अहवाल येण्याची विद्यापीठाला प्रतीक्षा आहे.
काय आहे प्रकरण
सहायक कुलसचिव सूर्यकांत काळे यांनी रजा इतर कारणावरून एका महिला कर्मचाऱ्यास उद्देशून शेरेबाजी केली. काही महिला कर्मचाऱ्यांनी अन्य अधिकारी अनिल जाधव यांच्याविरुद्धही त्रास देत असल्याची तक्रार विद्यापीठाकडे महिला आयोगाकडे केली. मात्र या दोन्ही प्रकरणांत अद्याप काहीही निष्पन्न झाले नाही.
महिनाअखेर अहवाल अपेक्षित
^विद्यापीठाने याप्रकरणी पाच सदस्यांच्या समितीस अहवाल देण्यास सांगितले आहे. महिनाअखेरयपर्यंत अहवाल येईल. त्यानंतरच पुढील योग्य ती प्रक्रिया किंवा कारवाई होईल. डॉ.एन. एन. मालदार, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ