आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव हवेत, पण ताण नको

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापुर - सार्वजनिक उत्सव वेळी शहर पोलिस बंदोबस्तासाठी असतात. इतर शहरांच्या तुलनेत सोलापूर येथे १८० दिवस जयंती, उत्सव असल्याने मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्तात गुंतलेले असतात. परिणामी पोलिसांच्या गुन्हे अन्वेषणाला गती मिळत नाही. सार्वजनिक उत्सव मंडळ, सामाजिक संस्था, संघटनांनी पोलिसांच्या मदतीविना समाजपयोगी उपक्रम राबवले तर सामाजिक पोत सुधारण्यास उपयोग करून घेता येईल. तसेच शहराची उत्सवी शहर म्हणून असलेली छाप पुसता येईल. पोलिस प्रशासनाने सध्या त्या दृष्टीने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, बारामती या शहरांत होत नाहीत तेवढे जयंती, उत्सव, सण, समारंभ शहरात साजरे होतात. वर्षातील आठ महिने पोलिस बंदोबस्तात असतात. ज्या कामावर लक्ष केंद्रित करणे गरजे आहे त्यावर पोलिसांग होत नाही. त्यामुळे गुन्हेगारी वाढतेय. म्हणजे घरफोड्या, चोऱ्यांचा तपास होत नाही. वाहतूक नियोजन करता येत नाही. उत्सव कमी वेळेत, सामाजिक उपक्रम रावबत, मिरवणुकीतील गोंगाट कमी झाल्यास ताण कमी होईल.

पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी मागील आठवड्यात चार दिवस नवरात्र, शिव जयंती, डॉ. आंबेडकर जयंती, अण्णा भाऊ साठे जयंती, मार्कंडेय जयंती, गणपती मंडळे, मोहरम कमिटी, मोहल्ला कमिटी सदस्यांची एकत्रित बैठक घेतली. यातून काही मुद्दे समोर आले. डॉल्बीवर अंकुश कसा आणता येईल, मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा जादा बंदोबस्त नको हे मुद्दे चर्चिले गेले. जे उत्सव अन्य शहरात होत नाहीत ते सोलापुरात होतात. आपण बहुभाषिक शहर म्हणतो. उत्सवाचा आनंद घेण्याचा साजरा करण्याचा प्रत्येकाला कायद्याने अधिकार आहे, तो कायद्याच्या चौकटीत. काही गोंधळ झाल्यास पोलिसांना जबाबदार धरण्यात येते. मुख्य उद्देश म्हणजे पोलिसाविना मिरवणुका, डॉल्बी नको, मद्य प्राशन करून नाचगाणे नको. या बाबींचा विचार झाल्यास उत्सव आनंददायी आणि विनासायास पार पडेल.

लातूर
गणपतीउत्सव दहा- अकरा दिवसांचा असतो. महत्त्वाचे काही उत्सव असतात ते फक्त एक दिवसाचे असतात. पोलिस बंदोबस्तविना पूर्ण होतात.

मिरवणुकीतील स्पर्धा टाळून विधायक कामाकडे वळण्याची गरज
उत्सवम्हटले की मिरवणुका आल्याच. कोण किती खर्च करतो अशी स्पर्धा मंडळात लागली आहे. हे बदलून विधायक आणि वेगळे उपक्रम राबवण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रम, सामुदायिक विवाह सोहळासारख्या उपक्रमातून लोकांना सहभागी करून घेतले जावे. लोकमंगल प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नपूर्ण योजना राबवते. अशा प्रकारचा उपक्रम हाती घेता येऊ शकतो. मिरवणुकीचा खर्च टाळून विधायक कामाकडे वळण्याची गरज आहे.'' राजसलगर, युवा प्रतिष्ठान

सामाजिक उपक्रमांवर भर हवा
उत्सवसाजरे करण्यात यावेत. पण, त्यातून सामाजिक पोत सुधारण्यावर भर देण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवणे, शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, शैक्षणिक साहित्य वाटप, अन्नदान, रुग्णांना मदत आदी सामाजिक उपक्रम राबवल्यास पैशाचे दान सत्कर्मी लागेल. उत्सव कमी वेळेत, कमी पैशात कसे साजरे करता येतील याबाबत विचारमंथन पाहिजे.
फक्त सोलापुरातच का?

आपल्याकडेजणू उत्सव साजरे करण्याची स्पर्धा लागली आहे. हा पायंडा अलिकडील काळात पडला आहे. पूर्वी म्हणजे पाच-सहा वर्षांपूर्वी ठरावीक उत्सव, जयंती साजरे होत. आत संख्या वाढलीय. कोणते मंडळ किती मोठे डॉल्बी लावतात, मिरवणुकीत किती खर्च करतो, त्याच्याहून अधिक खर्च आपण कसे करू यातून स्पर्धा लागते. व्यापारी, उद्योजक, दुकानदार यांच्याकडून जबरदस्तीने वर्गणी घेणे, दिली नाही तर धमकावणे असे प्रकार घडतात.

या बंदोबस्तात जातो वेळ
सिध्देश्वरयात्रा, गणपती, नवरात्र, डॉ. आंबेडकर जयंती, मोहरम, शिवजयंती, अण्णा भाऊ साठे जयंती यावेळी मोठा बंदोबस्त असतो. त्याशिवाय महाराणा प्रताप जयंती, वीरशैव कय्यया जयंती उत्सव, मार्कंडेय रथोत्सव, वाल्मीकी जयंती, ईद मिलाद, बसवेश्वर जयंती, शिवा काशीद, जांबमुनी महाराज उत्सव, अहिल्यादेवी होळकर उत्सव, शंभूराजे जयंती उत्सव यासह १८० उत्सव साजरे होतात.

अमरावती
गणपती,नवरात्र हेच मोठे उत्सव असतात. त्यावेळी पोलिसांची कसोटी असते. महापुरुष, नेते मंडळी यांचे उत्सव, मेळावे कमी प्रमाणात असतात. त्यामुळे उत्सवाचा ताण नाही.
कोल्हापूर गणपती,नवरात्र, मोहरम हे उत्सव सोडले तर अन्य जयंती उत्सवाचे प्रस्थ सीमित आहे. त्यामुळे नेहमी पोलिसांवर ताण नसतो. गणपती उत्सवात रस्ते लहान मंडप मोठा असतो. याचा त्रास होता. उत्सवानंतर आजोरा काढला जात नाही. डॉल्बी, रोषणाईचे प्रस्थ मोठेच आहे.
सांगली गणपतीउत्सवाचा मोठा ताण आहे. नवरात्र उत्सव अलिकडे मोठ्या प्रमाणावर आहे. अन्य महापुरुष, नेते यांचे ज़यंती उत्सव होतात. पण, मोठी मिरवणूक, रस्ते बंद, डॉल्बी असा काही प्रकार नाही.

पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना थेट प्रश्न
मंडळाशी कसा समन्वय साधणार ?

आगामीकाळात उत्सवाला सुरुवात होईल. मुख्य मध्यवर्ती मंडळे, त्यांचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी वैयक्तिक स्नेह ठेवणार. पोलिसांसोबत समन्वय साधणार आहे.
उत्सवशांततेसाठी काही योजना ?
- मिरवणुकीतकोणीही मद्यपान केले नाही तर गोंधळ होणार नाही. प्रत्येकांनी आपलेपणा जपून मदत करावी. डॉल्बी लावू नये. पारंपरिक वाद्य वाजवावेत. या बाबींचे पालन केले तर उत्सव शांततेत होऊ शकतो.

ताणकमी करण्यासाठी उपाय ?
- मिरवणूकपरवानगी देताना केव्हा सुरू करणार आणि संपणार याबाबत वेळ घेतली आहे. सर्वांनी वेळेचे पालन करावे. मुदतीत मिरवणूक पार पडली तर ताण येणार नाही.

उत्सवताणाचे नियोजन कसे?
- सण,उत्सव साजरा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. सर्वांनी नियमांचे पालन करावे. शिस्तबद्ध मिरवणूक काढावी. परिवारासह उत्सवाचा आनंद घ्यावा.
वाल्मीकी जयंती, ईद मिलाद

नागरिकांना होतो त्रास
जयंती,उत्सव काळात मिरवणूक मार्गावर दिवसभर वाहतूक बंद असल्यामुळे प्रवासी, रुग्ण यांचे हाल होतात. पर्यायी मार्गाचा वापर करताना दमछाक होते. डॉल्बीच्या आवाजाने रुग्ण, मुले, ज्येष्ठ नागरिकांना त्रास, -पोलिसांवर सोळा ते अठरा तास कामाचा ताण असतो.
महाराणा प्रताप जयंती
बातम्या आणखी आहेत...