सोलापूर- ५० च्या नव्या नोटा सोलापूरच्या बँक ऑफ इंडियामध्ये दाखल झाल्या आहेत. एकूण ३०० कोटी संख्येच्या या नोटा आहेत. आता लवकरच २०० च्या नोटाही येणार असल्याचे सांगण्यात आले. दोनशेच्या नोटा पहिल्यांदाच चलनात येतील.
गेल्या वर्षी नाव्हेेंबरला जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करण्यात आल्या. त्याने देशभर खळबळ उडाली होती. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्राने हा उपाय काढला, परंतु त्याने ‘लेने के देने पड गये..!’ अशी स्थिती झाली. केंद्रीय अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेच्या या उपायावर विरोधकांसह अर्थतज्ज्ञांनी टीका केली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने नव्या नोटा आणण्याचा सपाटा लावला आहे.
रिझर्व्ह बँकेकडे ५० आणि २०० च्या नोटांची मागणी नोंदवली. पैकी ५० च्या आल्या. लवकरच २०० च्या नोटाही येतील. त्याने चलन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.
- आर.एस. नेर्लेकर, करन्सी चेस्ट प्रमुख, बँक ऑफ इंडिया