आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुजाऱ्यांच्या भांडणात रुक्मिणीमाता ‘उपाशी’; नैवेद्य दाखवण्यास झाला एक तास उशीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- श्रीक्षेत्र पंढरपूर येथील मंदिरात दोन पुजाऱ्यांच्या भांडणामुळे शुक्रवारी रुक्मिणीमातेस एक तास उशिरा महानैवेद्य दाखवण्यात आला. या प्रकारामुळे भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.    


श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना शासनाचा आकृतिबंध मंजूर झाला. याबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. सेवाज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. पुजारी गणेश ताटे यांनी सात वर्षांची सेवा केली. त्यांनी आपले म्हणणे मंदिर समितीकडे सादर केले आहे. 


दुसरे पुजारी सुनील गुरव हे दोन वर्षांपासून सेवा बजावत अाहेत. त्यांनी गणेश ताटे यास ‘तू तुझे म्हणणे का सादर केलेस?’ असे म्हणत वाद घातला. त्यावर दोघांमध्ये भांडणे सुरू झाली.  ताटे आणि गुरव यांचा वाद साधारण एक तास सुरू होता. रोज सकाळी साडेदहा वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस महानैवेद्य दाखवण्यात येतो. श्री विठ्ठलास महानैवेद्य दाखवून तो रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात पोहोचल्यानंतर तेथे सुनील गुरव आणि गणेश ताटे यांच्यात वाद सुरू झाला. त्यामुळेच रुक्मिणीमातेस महानैवेद्य दाखवण्यास एक तास उशीर झाला. या प्रकारामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याशी संपर्क साधला असता ही बाब गंभीर असून, या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, भाविकांनीही या प्रकाराच्या चाैकशीची मागणी केेली.

बातम्या आणखी आहेत...