आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलीप मानेंसोबत शारीरिक संबंध ठेवण्‍यासाठी अश्‍लील चित्रफीत व्‍हायरल करण्‍याची धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- एका  महिलेसोबत सोशल मीडियावरून सूत जमवून तिच्यासोबत एका तरुणाने लग्न केले. शारीरिक संबंध ठेवताना चित्रीकरण करून त्याने ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसे न करण्यासाठी दिलीप माने व माझ्या भावासोबत संबंध ठेव म्हणून धमकावत संबंध ठेवण्यास भाग पाडले, अशी खासगी फिर्याद पीडित महिलेने न्यायालयात दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या अादेशान्वये माजी अामदार दिलीप माने, निखिल नेताजी भोसले व धनंजय भोसले या तिघांसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला अाहे.  माने हे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार अाहेत.  


हा प्रकार एक वर्षापूर्वी घडला हाेता. दिलीप माने, निखिल नेताजी भोसले, तृप्ती निखिल भोसले, वेदमती भोसले (४५), धनंजय भोसले (रा. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. 


हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार : माने   
हे प्रकरण न्यायालयातून आलेले आहे. वास्तविक या प्रकरणातून माझ्या भाच्यास जामीन मिळाला असून त्याबाबतच्या चौकशीनंतर प्रकरण बंद झाले. त्या वेळी माझेही नाव गुंतवले होते. पण चौकशीत काहीच दिसून आले नव्हते. त्यानंतर काल मी विधान परिषदेसाठी उमेदवारी भरली. त्यामुळे ब्लॅकमेलिंग करण्यासाठी हा प्रकार पुन्हा होत असल्याचे दिलीप माने म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...