आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपटाच्या ‘विद्यापीठाने’ दिले सोलापूरकरांना रसग्रहणाचे धडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जगात पहिल्यांदा कोणता चित्रपट तयार झाला, शूटिंग शब्दाचा जन्म कसा झाला, चित्रपटाला गोष्ट हवी असते. संकलन म्हणजे काय? संगीत, छायाचित्रण या सगळ्या परिभाषांना बोलीभाषेत आणून समरस करत ज्येष्ठ समीक्षक समर नखाते आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी एका दिवसात चित्रपटाच्या जन्मापासून ते पाहायचे कसे याचे उत्तम धडे दिले.
निमित्त होते प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने होणाऱ्या सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वातावरण निर्मितीनिमित्त आयोजित केलेल्या चित्रपट रसग्रहण कार्यशाळेचे. शिवछत्रपती रंगभवनात कार्यशाळेस तरुणाईसोबत ज्येष्ठ चित्रपटप्रेमींनी हजेरी लावली होती. पुणे फिल्म फाउंडेशन, चित्रपट महोत्सव नियोजन संघाच्या सहकार्याने कार्यशाळा झाली. उद््घाटनावेळी डॉ. पटेल, नखाते, प्रिसिजनचे यतीन शहा, अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा आदी उपस्थित होते.

डॉ. पटेल यांनी चित्रपटाविषयीची आस्था असणाऱ्या माणसांनी सोलापुरात असा मोठा महोत्सव आयोजित केला, याचा आनंद होतो आहे. अशा महोत्सवातून तरुण दिग्दर्शक आणि त्यांच्या कलाकृती पुढे येत आहेत. हा मुद्दा कलाविष्काराच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पटेल यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमाने शंकांचे निरसन केले.

पहिल्या सत्रात नखाते यांनी अतिशय सहज सोप्या शब्दात चित्रपटाचे परीक्षण म्हणजेच रसास्वाद कसा घ्यायचा याचे विश्लेषण केले. २८ डिसेंबर १८९५ मध्ये पहिला चित्रपट परदेशात तयार झाला. त्यानंतर चित्रपट तयार करण्याच्या पद्धती, त्याचा वेग वरचेवर वाढत गेला. त्याने कल्पकता वाढली. मनोरंजनासोबत तत्कालीन सामाजिक समस्या, त्यांच्या आर्थिक, भौगोलिक आणि विविध विषयांना मांडण्याचे हे उत्तम माध्यम आहे. केवळ कॅमेऱ्यांच्या समोर केली जाणारी ही व्यावहारिक संकल्पना असते जे पाहणे सोपे असते. मात्र समजून घेणे फार कठीण असते. हजार वेळा पाहिलेला चित्रपट जेव्हा आपण विश्लेषणाच्या दृष्टीने पाहू तेव्हा ते तुमची झाेप उडवू शकते. मात्र ती समजून घेण्यासाठी तुम्ही सजग असणे, तुमच्या दृष्टीला शास्त्रशुद्धतेची जोड देणे गरजेचे असते, असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, चित्रपट पाहताना तुमच्या आवडीचे मुद्दे केवळ गृहित धरता संपूर्ण चित्रपटाचे मिश्रण काय आहे? याचा विचार करून जे आवडते त्याला स्वीकारा. त्यामुळे जे थोपले जाते त्याचा आपोआप शेवट होतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मिस्टर अॅण्ड मिसेस अय्यर, चक दे अशा विविध प्रकारच्या चित्रपटांवर चर्चा केली.

पहिलेवर्क शॉप सोलापुरात
समरन खाते यांनी माईक हाती घेतला आणि त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत ३० वर्षांपूर्वी सोलापुरात आलो होतो. ते माझ्या आयुष्यातील पहिले चित्रपट परीक्षण कार्यशाळेच्या निमित्ताने आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा त्याच कामासाठी आलो आहे, अशा भावना व्यक्त केल्या. त्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.

पुणेफिल्म फाउंडेशन, चित्रपट महोत्सव नियोजन संघाच्या सहकार्याने कार्यशाळा झाली. उद््घाटनावेळी डॉ. पटेल, नखाते, प्रिसिजनचे यतीन शहा, अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा आदी उपस्थित होते.

डॉ. पटेल यांनी चित्रपटाविषयीची आस्था असणाऱ्या माणसांनी सोलापुरात असा मोठा महोत्सव आयोजित केला, याचा आनंद होतो आहे. अशा महोत्सवातून तरुण दिग्दर्शक आणि त्यांच्या कलाकृती पुढे येत आहेत. हा मुद्दा कलाविष्काराच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पटेल यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमाने शंकांचे निरसन केले.

पहिल्या सत्रात नखाते यांनी अतिशय सहज सोप्या शब्दात चित्रपटाचे परीक्षण म्हणजेच रसास्वाद कसा घ्यायचा याचे विश्लेषण केले. २८ डिसेंबर १८९५ मध्ये पहिला चित्रपट परदेशात तयार झाला. त्यानंतर चित्रपट तयार करण्याच्या पद्धती, त्याचा वेग वरचेवर वाढत गेला. त्याने कल्पकता वाढली. मनोरंजनासोबत तत्कालीन सामाजिक समस्या, त्यांच्या आर्थिक, भौगोलिक आणि विविध विषयांना मांडण्याचे हे उत्तम माध्यम आहे. केवळ कॅमेऱ्यांच्या समोर केली जाणारी ही व्यावहारिक संकल्पना असते जे पाहणे सोपे असते. मात्र समजून घेणे फार कठीण असते. हजार वेळा पाहिलेला चित्रपट जेव्हा आपण विश्लेषणाच्या दृष्टीने पाहू तेव्हा ते तुमची झाेप उडवू शकते. मात्र ती समजून घेण्यासाठी तुम्ही सजग असणे, तुमच्या दृष्टीला शास्त्रशुद्धतेची जोड देणे गरजेचे असते, असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, चित्रपट पाहताना तुमच्या आवडीचे मुद्दे केवळ गृहित धरता संपूर्ण चित्रपटाचे मिश्रण काय आहे? याचा विचार करून जे आवडते त्याला स्वीकारा. त्यामुळे जे थोपले जाते त्याचा आपोआप शेवट होतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मिस्टर अॅण्ड मिसेस अय्यर, चक दे अशा विविध प्रकारच्या चित्रपटांवर चर्चा केली.

पहिले वर्कशॉप सोलापुरात
समर नखाते यांनी माईक हाती घेतला आणि त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत ३० वर्षांपूर्वी सोलापुरात आलो होतो. ते माझ्या आयुष्यातील पहिले चित्रपट परीक्षण कार्यशाळेच्या निमित्ताने आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा त्याच कामासाठी आलो आहे, अशा भावना व्यक्त केल्या. त्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.

शूटिंग शब्दांचा जन्म असा
१८९५ नंतर विविध प्रकारच्या बदलानंतर काही काळ गेला की, छायाचित्रण करण्यासाठी बंदुकीसारखा आकार असलेल्या कॅमेऱ्याने चित्रण केले जात होते. तोवर या चित्रणाच्या प्रकाराला काय म्हणतात हे ठाऊक नव्हते. मात्र, त्यावेळी तो चित्रण करताना पक्ष्यांच्या थव्याचे केले जाते म्हणजे ते थव्यातील पक्ष्यांना मारण्यासाठी हे केले जाते की काय अशा समजुतीने शूटिंग हा शब्द जन्माला आला आणि आजही तसेच संबोधले जाते, असे नखाते यांनी सांगितले.
चित्रपट रसग्रहण कार्यशाळेचे उद््घाटन करताना ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल. त्यावेळी सुहासिनी शहा, यतीन शहा आणि चित्रपट समीक्षक प्रा. समर नखाते
बातम्या आणखी आहेत...