आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपट महामंडळाच्या घटनेची दुरुस्ती करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महामंडळाच्या घटनेची दुरुस्ती ते कलावंतांना न्याय देणे, अभिनयाचे प्रशिक्षण देणे, कलावंतांची बनावट ऑडिशनमधून फसवणूक थांबविणे आदी गोष्टी करणार असल्याची माहिती मराठी चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज भोसले आणि खजिनदार वर्षा उसगावकर यांनी येथे पत्रकारांशी बातचीत करताना दिली.
उसगावकर म्हणाल्या, की चित्रपट क्षेत्रात महिलांवर अन्याय झाल्यास आम्ही स्वत: पुढे येणार. प्रकरणाचा तपास लावून दोषींवर कारवाईसाठी प्रयत्न करणार आहे. चित्रपटासाठी संधी दिल्याबद्दल, चांगले चित्रपट दिल्याबद्दल लेखक, दिग्दर्शन आणि निर्माता यांचे आभार मानल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. भोसले यांनी घटना दुरुस्ती आणि त्यात काही नव्या गोष्टींचा समावेश करणे हे आमचे पहिले उद्दिष्ट आहे, असे म्हणाले. केवळ मुंबईत कार्यालयात बसणार नाही तर विभागीय कार्यालयाच्या वतीने काम करणार आणि विविध चित्रपट निर्मिती संस्थांवर भरारी पथकाच्या माध्यमाने अंकुश ठेवणार आहे, असेही स्पष्ट केले.

छोट्या चित्रपटांवर अंकुश आणणार
अभिनेता शेलार यांनी नव्या कलावंतांसाठी विविध प्रकारचे ज्ञान देणारे प्रशिक्षण, कार्यशाळा घेण्यात येतील. त्यात मोठे अभिनेते, दिग्दर्शक कलावंत यांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे नव्या कलावंतांना व्यासपीठ, त्यांची निवड आणि स्थानिक स्तरावर त्यांना न्याय देण्याचे काम होईल, असे सांगितले. यावेळी छोटे छोटे येणारे चित्रपट आहेत, त्यांच्यावर अंकुश बसविणार आहे. शिवाय घटनेत छोट्या लघुपटांवर आणि मालिकांवर चाप ठेवण्याचेही काम केले जाणार असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...