Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» Film On The Life Of Government Lawyer Ujjwal Nikam

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर 'पॉवर अॉफ लॉ' चित्रपट

प्रतिनिधी | Oct 11, 2017, 12:36 PM IST

सोलापूर- सरकारी वकील बनून अनेकांना न्याय मिळवून देणारे वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनात नेमके काय घडले ते एका रूपेरी पडद्यावर चितारण्याचे काम सोलापूरच्या सुवदन यांनी केले आहे, अशी माहिती सुवदन आंग्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. चित्रपटात सुवदन आंग्रे, मुकेश तिवारी, अनंत जोग, अशोक शिंदे, योगेश वणवे, मिथिला नाईक यांनी भूमिका केल्या आहेत. पत्रकार परिषदेस नाट्य लेखक मोहन आंग्रे, विशाल माने उपस्थित होते.

6 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला पॉवर अॉफ लॉ चित्रपट श्री अंबिका माता प्रॉडक्शन निर्मित आहे. जो कायद्यात राहतो तोच फायद्यात राहतो, असा अर्थ सुवदन आंग्रे यांनी या चित्रपटाचा असल्याचे सांगितले.

निर्माता योगेश वणवे असून, सहनिर्माता, कथा, दिग्दर्शन सुवदन आंग्रे यांचे आहे. संवाद गणेश महिंद्रकर, छायाचित्रण दिलीपकुमार डोंगरे, संगीत श्रीरंग आरस, गीतकार म्हणून सचिन निकम, गायक मिलिंद इंगळे, वैशाली सामंत, कविता राजहंस, लाइन प्रोड्यूसर म्हणून दिनेश पुजारी यांनी काम पाहिले.

Next Article

Recommended