आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार पाटील यांच्या नातवावर फिल्मी स्टाईल प्राणघातक हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
सोलापूर- पूर्ववैमनस्यातून एका युवकावर प्राणघातक हल्ला झाला. संदीप सुरेश पाटील (वय २५, रा. मौलाली चौक) असे जखमीचे नाव अाहे. तो माजी अामदार गुरुनाथ पाटील (होटगी) यांचा नातू अाहे. ही घटना मौलाली चौक परिसरात सोमवारी घडली. महिलांनी आरडओरडा केल्याने हल्लेखोर पळून गेले आणि अनर्थ टळला. 

हल्ला फिल्मी स्टाईलने पाळत ठेवून करण्यात आला. पाटील ययांनी दुपारी एकच्या सुमाराला कारमधून शिवाजी चौकातील एका अौषध दुकानातून शेतात फवारण्यासाठी अौषध घेतले. घरी येताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत अाले. अलकुंटे चौकात कार अाडवी लावून गाडी थांबविली. काचा फोडून पाटील यांना बाहेर काढले. हाॅकीस्टीकने लोखंडी राॅडने पायावर हातावर मारहाण केली. त्यात त्यांचा उजवा पाय हातावर गंभीर जखम झाली असून अन्य ठिकाणी मुक्का मार लागला अाहे. 

मारहाणीची घटना पाहून परिसरातील काही महिला धावत अाल्या. त्यांनी अारडाअोरड करत विरोध केल्यामुळे मारेकरी गाडी सोडून पळून गेले. पाटील हे काही काळ रस्त्यावरच पडून होते. पोलिसांना फोन केल्यानंतर काही वेळातच पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर पथक घटनास्थळी अाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. वृत समजताच नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी झाली. 

याबाबत विचारले असता श्री. अंकुशकर म्हणाले की, मागील अाठवड्यात संगमेश्वर काॅलेज पसिरसरात झालेल्या भांडणात पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल झाला अाहे. त्यात एकूण नऊ संशयित असून दोघांना या पूर्वीच अटक झाली अाहे. पाटील यांचा शोध घेण्यात अाला होता, पण सापडला नाही. त्याच कारणावरून हा प्रकार घडला की काय याचीही चौकशी सुरू अाहे. गुन्ह्यातील गाडी जप्त केली अाहे. मारहाणप्रसंगी पाटील यांचा कारचालक पळून गेला होता. काही वेळाने परतून त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. सदर बझार पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

पूर्ववैमनस्यातून घटना 
मागील मंगळवारी संगमेश्वर महाविद्यालयाजवळ मैदानात तरुणांच्या दोन गटात ‘रागाने का बघतो’ यावरून हाणामारी झाली होती. यात पृथ्वी नागेश गायकवाड जखमी झाला होता. अॅशली अँथनीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यापैकी दोघांना अटक झाली. तपासात संदीप पाटील याचे नाव समोर आले होते.तो अाठ िदवसांपासून तो बेपत्ता होता. पोलिसांनी दोन-तीनदा घरी जाऊन त्याची चौकशी केली होती. 
बातम्या आणखी आहेत...