आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलिदान चौकात फायनान्सची तोडफोड, फसवणुकीची गुंतवणूकदारांची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बलिदान चौकातील एका खासगी फायनान्सने काही दिवसांपासून व्यवहार बंद केले अाहेत. काही गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याप्रकरणी बुधवारी सायंकाळी फायनान्स कार्यालयासमोर गर्दी केली. दरम्यान, कार्यालयाची काहीनी तोडफोड केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यानंतर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त लावला होता.

मागील काही वर्षांपासून बलिदान चौकात फायनान्स कंपनी कार्यरत अाहे. सुमारे चार ते पाच हजार नागरिक सभासद अाहेत. अनेकजणांनी यामध्ये पैसे गुंतविले अाहेत. महिन्याकाठी त्यांना व्याजापोटी काही पैसे कंपनीकडून मिळत होते. विश्वासावर हे काम सुरू होते. परंतु गेल्या दोन-तीन महिन्यांपासून लोकांना पैसे देण्याचे बंद केले होते. अनेकदा विचारणाही झाली पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी काहीजणांनी फायनान्स कार्यालयात धुडगूस घातला. सायंकाळी पुन्हा काहीजण एकत्रित जमले. अकरा जणांची कोअर टीम तयार करून एकत्रित तक्रार करण्यासाठी चर्चा करू असे सभासदांनी सांगितले.

पुढे वाचा... आतापर्यंत ८० ते ९० जणांनी केली तक्रार