आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर रस्त्यावरील कचरा डेपोला भीषण आग; धुराचा नागरी वस्तीला त्रास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरालगतच्या तुळजापूर रोडवरील सर्वात मोठ्या कचरा डेपोला मंगळवारी रात्री ११ च्या सुमाराला अचानक आग लागली. शहरालगतच्या कचरा डेपोला आग लागण्याची १५ दिवसातील ही दुसरी घटना आहे. सुमारे ३२ एकर परिसरात विस्तारलेल्या या कचरा डेपोच्या जवळपास एकर परिसरात ही आग पसरली होती.महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या तीन गाड्याच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. 

आगीतून निघणाऱ्या धुराचा त्रास डेपो लगतच्या नागरी वस्तीला होत आहे. वारा फिरेल तशी धुराची दिशा फिरत आहे. ही आग विझवण्यासाठी एक महिन्याहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे अिग्नशामक विभागाचे प्रमुख केदार आवटे यांनी सांगितले. यापूर्वीही कचरा डेपोला आग लागली होती. ती विझवण्यासाठी एक महिन्याहून अधिक कालावधी लागला हाेता. 
बातम्या आणखी आहेत...