आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील करमणूक विभाग, जुने रेकाॅर्ड जळाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हाधिकारी कार्यालय अावारातील करमणूक कार्यालयाचा काही भाग आणि जुन्या रेकाॅर्ड रूमला रविवारी रात्री अाग लागली. सुटी असल्यामुळे कार्यालय दिवसभर बंदच होते. रात्री अाठच्या सुमाराला करमणूक कार्यालय विभागातून धूर येत असल्याचे पाहून नागरिकांनी अग्निशामक दलाला कळवले. काही वेळातच पाण्याचा फवारा करून अाग अाटोक्यात अाणली. 
 
करमणूक कर विभागाच्या शेजारी असलेल्या रेकाॅर्ड रूमलाही अाग लागली. या ठिकाणी जुने साहित्य कागदपत्रे असल्यामुळे अाग भडकत होती. पाठीमागील कौलारू उचकटून भिंतीचा कोपरा पाडून धूर जाण्यासाठी जागा करून दिल्यानंतर त्यातून पाणी फवारण्यात येऊन आग आटोक्यात अाणली. 
 
जिल्हाधिकारी कार्यालय पोलिस अधीक्षक कार्यालयसमोर करमणूक कर विभाग, जुने रेकाॅर्ड रूम, त्यासमोर नवे रेकाॅर्ड रूम निवडणूक कार्यालयाचे साहित्य ठेवण्याची रूम अाहे. सुरुवातीला करमणूक विभागाच्या एका खोलीतून अागीचे धुराचे लोट बाहेर पडत होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी चार गाड्यांमधून सुरुवातीला पाणी फवारले. कौलारूच्या खाली लाकडी अँगल असल्यामुळे अाग भडकत होती. त्या शेजारील रेकाॅर्ड रूमनेही पेट घेतला. त्यातील जुनी कागदपत्रे, जुने फर्निचर असल्यामुळे अाग भडकली. महापालिकेचे जेसीबी मागवून पाठीमागील भिंत कौलारू काढून धुराला जागा करून देण्यात आली. जेसीबीवर चढून जवानांनी वरून पाण्याचा मारा केला. त्याने अाग अाटोक्यात अाली. रात्री अाठ ते पावणे दहा या वेळेत सहा गाड्यांपैकी पाच गाड्या पाणी फवारले. सदर बझार पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरसिंग अंकुशकर, फौजदार राठोड त्यांचे पथकही मदतीला अाले. अागीचे कारण समोर अाले नसले तरी शाॅर्टसर्किटमुळे अाग लागल्याची चर्चा अाहे. 
 
फोनवरून घटनेची माहिती 
रविवारअसल्यामुळे कार्यालये बंदच होती. काही अधिकारी, कर्मचारी परिवारासह बाहेर फिरायला गेलेले. काहीजण घरी होते. काही कर्मचाऱ्यांना अागीची माहिती समजल्यानंतर ते घटनास्थळी येत होते. काही अधिकारी कुठल्या विभागात अाग लागली अाहे, गंभीर अाहे का, अशी माहिती विचारून घेत होते. जमलले नागरिक घटनेचे चित्रीकरण मोबाइलमध्ये करून घेत होते. 
 
सहा गाड्या मागवल्या अाहेत. पंचवीस - तीस जवान काम करत अाहेत.कौलारूखाली लाकडी अँगल अाहेत. काही ठिकाणी सागवानी लाकडे अाहेत. रेकाॅर्डरूमध्ये जुने पेपर्स लाकडी साहित्यामुळे अाग धुमसत होती. नेमके किती नुकसान झाले, कोणते विभाग जळाले हे महसूल अधिकारी अाल्यानंतर समजेल. त्यांनाही माहिती दिली अाहे. 
- केदार आवटे, अग्निशामक दलाचे अधीक्षक 
बातम्या आणखी आहेत...