आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या पार्सल गाेदामाला आग, २० मिनिटांत ७० लाखांचे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर रेल्वे स्थानकावरील पार्सल आॅफिसच्या गोदामाला मंगळवारी सायंकाळी ५ वा. ५ मिनिटांनी आग लागली. ५ वा. २५ च्या दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. २० मिनिटात ३० ते ४० दुचाकी, फळांच्या पेट्या, टॉवेल्स असे सुमारे ७० लाखांचे साहित्य जळून खाक झाले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी रेल्वेने तीन सदस्यांची समिती नेमली असून त्यांना सात दिवसात अहवाल द्यायचा आहे.

पार्सल ऑफिसमध्ये मंगळवारी सायंकाळी नियमित काम सुरू होते. याचवेळी ५ वा. ५ मिनिटांनी ऑफिसमध्ये अचानक आग लागली. अग्निशामक दलाच्या सहा गाड्यांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. पार्सल ऑफिसमधील दुचाकी आणि टॉवेल्सच्या गठ्ठ्यांमुळे आगीने रौद्र रूप धारण केले. घरगुती वस्तू, फळे आदी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ३० ते ४० दुचाकी भस्मसात झाल्या आहेत. १२ लाख रुपयांचे टॉवेल्स, हजारो रुपयांचे डाळिंब व इतर फळांचा कोळसा झाला होता.
पुढीलस्लाइड्सवर वाचा नेमकी कशामुळे लागली आग.....
बातम्या आणखी आहेत...