आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - उभ्या ऑइल टँकरवर पाठीमागून जीप धडकून झालेल्या भीषण अपघातात जीपमधील एकाच परिवारातील चार ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता साेलापूर-पुणे महामार्गावर पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथे हा अपघात घडला.

या अपघातात अक्कलकोट येथील नारायण रामचंद्र आलोने (६५, रा. समर्थ चौक, मेन रोड, अक्कलकोट), गोकुळ रामचंद्र आलोने (४५, रा. अक्कलकोट), सुलोचना नारायण आलोने (५५, रा. अक्कलकोट) व प्रियंका ओंकार आलोने (२२, रा. अक्कलकोट) यांचा मृत्यू झाला, तर ओंकार गोकुळ आलोने (२७, रा. अक्कलकोट) हे गंभीर जखमी झाले. आलोने कुटुंबीय पुणे येथे मुलीला भेटण्यासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. इंडियन ऑइल कंपनीतून ऑइल भरून पंढरपूरकडे निघालेला एक टँकर (एमएच १३ आर २९०१) पंक्चर झाल्याने पाकणी येथे महामार्गावरील स्लो लेनवर उभा होता. मात्र जीपच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही भरधाव गाडी उभ्या टँकरवर पाठीमागून आदळली. अपघात इतका भीषण होता की जीप पूर्णपणे दबली गेली.
यात सर्व पाच जणांना तातडीने रुग्णालयात नेण्यात अाले. मात्र यापैकी चाैघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर ओंकार यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बातम्या आणखी आहेत...