आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विठ्ठल दर्शनाहून परतणाऱ्या ५ महिला वारकऱ्यांचा अंत, टाटा एसला ट्रकची धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाळा-पंढरपूरहून दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. जण गंभीर, तर वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत. जेऊर (ता.करमाळा) येथील शेलगाव फाट्याजवळ गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली.

संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या (त्र्यंबकेश्वर, जि. नािशक) दिंडीतील वारकऱ्यांनी जुलैला विठ्ठलाचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी टाटा एसने (एमएच ०४ एफजे ६८३८) अहमदनगरकडे परतत असताना शेलगाव फाट्याजवळ ट्रकने (टीएन ५२ एफ ७०९५) समाेरून धडक दिली. यात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमींवर अहमदनगर, तर किरकोळ जखमींवर करमाळ्यात उपचार सुरू आहेत. अपघातात भागुबाई नामदेव शेळके (६२,तळुशी, ता. इगतपुरी, जि. नाशिक), अंजनाबाई मारवद भगत (४५, बलाईपुरी, ता. इगतपुरी),हिराबाई गुळवे (५०, गुळवेवाडी, त्रिंबकेश्वर), लक्ष्माबाई चव्हाण (५५ रा, माणीखांब, ता. इगतपुरी), जिजाबाई दिनर (६०, हिवरे, ता. सिन्नर) यांचा मृत्यू झाला.

विठ्ठल दर्शन शेवटचे ठरले
संतनिवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या दिंडीतील वारकऱ्यांचा अहमदनगरमध्ये दोन दिवस मुक्काम होता. अाषाढी वारीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे विठ्ठलाचे दर्शन होत नाही; आणि अनायासे जुलैला भागवती एकादशी आणि संत निवृत्तीनाथ यांची पुण्यतिथी अाल्याने त्यांनी याच दोन दिवसांत पंढरपूरहून दर्शन घेऊन दिंडीत पुन्हा सहभागी व्हायचे, अशी योजना आखली. त्यानुसार दर्शन घेऊन परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.
- मृतांमधील पाचही महिला भाविक या नाशिकच्‍या इगतपूरी येथील आहेत.
- एका टाटा एस वाहनात ते सर्वजण पंढरपूरला गेले होते.
- दर्शन करुन परतताना हा अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकने वाहनाला धडक दिली.
- या वाहनात 13 महिला आणि 5 पुरूष असे एकूण 18 प्रवासी होते.
- दरम्‍यान पाच जणांचा अपघातात मृत्‍यू झाला आहे.
- पाचही महिलांची अद्याप ओळख पटली नसल्‍याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
- जेऊरजवळ वारक-यांच्‍या वाहनाला ट्रकने धडक दिली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अपघातग्रस्‍त वाहन आणि संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...