आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कॉर्पिओ पळवणाऱ्या पाच जणांना अटक, ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍मक छायाचित्र
सोलापूर- पंढरपूरलाजाण्यासाठी जाण्याचा बहाणा करून बीड येथून स्कॉर्पिओ (एमएच२३, एडी२७०७) पळविणाऱ्या पाच संशियतांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्याच्या आठ दिवसांत ही कामगिरी केली.
१२ ऑगस्ट रोजी टेंभुर्णी पोलिसात अच्युत शंकर भालेकर (वय ३०, रा. देवगाव, बीड) यांनी फिर्याद दिली होती.
पुण्यातून गणेश नवनाथ हुलगे (रा. पांधवडी, करमाळा), धनंजय पोपट कांबळे (रा. मोरवड,करमाळा), दीपक संभाजी राजकुळे (रा. लासूर, जळगाव), बाबूराव ऊर्फ पप्पू मच्छिंद्र साळवे (रा. पांदवडी, करमाळा), विक्रम कांतीलाल कांबळे (रा. रुई, सोलापूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून स्कॉर्पिओ ताब्यातही घेतली. यापैकी गणेश हुलगे याने यापूर्वी कर्जत भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन मोटारसायकल, तसेच शिंगरापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून टेम्पोची चोरी केल्याची कबुली दिली आहे.संशियत आरोपींना शोधण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक केली होती. त्यांनी परिश्रम घेत ही मोहीम पूर्ण केली आणि संशयितांना ताब्यात घेतले.
पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन कौसडीकर यांच्या पथकातील सुनील खेडेकर, संदीप चव्हाण, नारायण शिंदे, महिबूब शेख, गोरख गांगुर्डे, अजित वरपे, नारायण गाेलेकर, मोहन मनसावले, व्यंकटेश मोरे, अरुण केंद्रे, सागर शिंदे, सचिन मागडे, इस्माईल शेख, राहुल सुरवसे, समीर शेख यांनी कामगिरी पार पाडली.

स्कॉर्पिओ भाड्याने ठरवून चालकास लुटले होते
पंढरपूरयेथे दहाव्यासाठी जाण्याचा बहाण करून भालेकर यांची स्कॉर्पिओ ठरवली. काळे असे खोटे नाव त्याने सांगितले. १२ ऑगस्ट रोजी सकाळी पंढरपूरकडे निघाले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी हद्दीतील आढेगावच्या पुढे सात ते आठ किलोमीटर आले असता गाडीचे चालक भालेकर यास मारहाण करून खिशातील पैसे आणि मोबाइल काढून घेऊन त्यास नायलॉनच्या दोरीने बांधण्यात आले. त्याला तेथेच सोडून त्याच्या ताब्यातील स्कॉर्पिओ पळवून नेली.