आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरातून 1400 लाेक सुरक्षित स्थळी, नंदुरबारमध्‍ये अख्खे गाव डाेंगरावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून पंचगंगा नदीने धाेक्याची पातळी अाेलांडल्यामुळे बुधवारी काेल्हापूर शहराला पुराचा वेढा पडला हाेता. महामार्गावर पाणीच पाणी झाल्याने काेकणात जाणारे सर्व मार्ग बंद झाले हाेते. अांबेवडे येथे एक शाळकरी मुलगा वाहून गेल्याची भीती व्यक्त हाेत अाहे, तर दाेन मुलांना वाचविण्यात जवानांना यश अाले. दरम्यान, पुरात अडकलेल्या २८० हून अधिक कुटुंबांतील जवळपास १४०० लोकांना प्रशासन आणि एनडीआरएफ जवानांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलविले.
शहरामध्ये दिवसभरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरूच असल्याने पंचगंगेने बुधवारी सकाळीच धोक्याची पातळी ओलांडली. शहरातून वाहणाऱ्या जयंती नाल्याचे पाणीही वाढतच असून यामुळे सुतार मळा, व्हीनस काॅर्नर परिसरात सखल भागात पाणी साठले आहे. या भागातील अनेकांचे स्थलांतर करावे लागले आहे. दसरा चौकातून कसबा बावड्याकडे जाताना लागणारा पूल पाण्याखाली गेला हाेता. एनडीआरएफच्या जवानांनी रात्रीपासूनच बचाव कार्याला सुरुवात केली. सकाळी प्रयाग चिखली येथील ४८, वळीवडे येथील २५ तर शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी आणि कवठेसार येथील २१ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले. पन्हाळा तालुक्यातील मराठवाडी येथील दरड कोसळण्याची शक्यता असल्याने तेथील १५ लोकांना केकतवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले.
कोकणाकडे जाणारे मार्ग बंद
शहरातून जाणाऱ्या तिन्ही रस्त्यांवर पाणी आल्याने करूळ, आंबा आणि फोंडा या तीन घाटांच्या माध्यमातून कोकणाकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली असून केवळ आजरा आंबोली मार्गे कोकणातील वाहतूक सुरू आहे. यामुळे प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणावर हाल सुरू अाहेत. कोकणाकडे जाणारी मालवाहतूकही थांबली आहे.
एनडीआरएफने वाचवले
‘एनडीअारएफ’च्या ४२ जवानांचे पथक पूरग्रस्तांना मदतीसाठी तैनात अाहे. मंगळवारी रात्री कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्लीजवळ दोन ट्रक पाण्यात गेले. त्यातील चाैघांना सुखरूपपणे बाहेर काढले. तसेच पुरात बुडालेली कारही पथकाने बाहेर काढली. आंबेवाडी येथील यात्री निवासातील अाठ लोकांना पथकाने सुरक्षित ठिकाणी नेले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, धरण फुटले पळा पळा! अफवेने दोन हजार लोक घरातील मिळेल त्या वस्तू घेऊन डोंगरावर.., पुरातील लोकांना कसे नेले सुरक्षित स्‍थळी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...