आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळे उड्डाणपुलाचा मुहूर्त मुरूम नसल्याने लांबला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर-पुणेमहामार्गावर बाळे उड्डाणपुलाचे काम अनेक अडचणीनंतर मार्गी लागले. येत्या दसऱ्यापर्यंत उड्डाणपूल वाहतुकीला खुला होणार होता. परंतु मुरूम उपलब्धतेअभावी काम रखडले असून पूर्ण होण्यास महिन्याचा कालावधी लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर पुलाच्या ठिकाणी पूर्वी नियोजित स्मशानभूमी होती. स्मशानभ्ूमीकरता पर्यायी जागा देण्यास विलंब झाला. तसेच उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांचा प्रश्न सोडवताना बराच अवधी लागला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सदरच्या दोन प्रश्नांचे निरसन झाल्यानंतर येत्या दसऱ्याला पुला वाहतुकीला खुला करण्याची हमी दिली होती. परंतु मुरूम उपलब्धतेअभावी पुलाच्या कामाची गती संथ झाली आहे.

पुलाच्या भरावाकरता सुमारे वीस हजार ब्रास मुरूम लागण्याची शक्यता आहे. िजल्हा प्रशासनाने सदरच्या पुलाकरता आवश्यक असणारा मुरूम हिरज येथून घेण्याची परवानगी दिली. प्रथम येथून मुरूम घेण्यात आला. पण राष्ट्रीय महामार्गकरता हा मुरूम योग्य नसल्याने मुरूम घेणे बंद करण्यात आले. यानंतर एनटीपीसी येथील मुरूम घेण्याचे ठरले. येथे मुरूम कसा आणि किती याची तपासणी होत असून दोन- तीन दिवसांत तपासणी होईल. येथील मुरूम योग्य असल्यास एका महिन्यात काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाच्या मदतीने मुरूम घेण्याची प्रक्रिया
^आम्हाला आवश्यक असा मुरूम उपलब्ध झाला नाही. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने नव्याने मुरूम घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुरूम चांगला मिळताच एका महिन्यात पुलाचे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीला खुला करण्यात येईल.” बी.बी. इखे, संचालक, राष्ट्रीय महामार्ग
बातम्या आणखी आहेत...