आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छावणीतही होणार उपासमार, जिल्ह्यात सात लाख जनावरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शेतकऱ्यांसह विरोधकांच्या रेट्यामुळे अखेर उस्मानाबादसह बीड, लातूर जिल्ह्यात चारा छावण्या उघडण्याबाबत शासनाने गुरुवारी (दि. २०) अध्यादेश काढला. त्यानुसार मोठ्या जनावरांना प्रतिदिन ७० आणि लहान जनावरांच्या चाऱ्यापोटी छावणीचालकांना ३५ रुपये देण्यात येणार आहेत. परंतु, सध्या चाऱ्याचा भाव शेकडा हजार रुपये अर्थात कडब्याच्या एका पेंढीला ३० रुपये आहे. एका जनावराला दिवसाला चार पेंढ्यांप्रमाणे किमान १२० रुपयांचा चारा लागतो. परंतु, ७० रुपयेच मिळणार असल्याने छावणीतही जनावरांची उपासमार होण्याची चिन्हे आहेत.

यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने चारा छावण्या उघडाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली होती. यासाठी विविध संघटनांसह राजकीय पक्षांनी आंदोलनेही केली. वाढत्या रेट्यामुळे अखेर राज्याच्या महसूल वन विभागाने उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यात चारा छावण्या उघडण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. चारा टंचाईबाबत विभागीय आयुक्तांनी ३१ जुलै रोजी शासनाला अहवाल सादर केला होता. त्यानुसार उपाययोजनांसंदर्भात ११ ऑगस्ट रोजी बैठक झाली होती. यावेळी उस्मानाबादसह तीन जिल्ह्यांत चारा छावण्या उघडण्याबाबत निर्णय झाला आहे. या भागात आवश्यकतेप्रमाणे चारा उपलब्ध होईपर्यंत समानधानकारक पाऊस होईपर्यंत छावण्या सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
टंचाईग्रस्त भागात अंतिम पर्याय म्हणून छावण्या सुरू करण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास जनावरांची किमान संख्या २५० पर्यंत शिथील करण्याचे अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, टंचाईमुळे जनावरांचे प्रचंड हाल होत होते. चारा छावण्यांमुळे या जनावरांना काहीसा आधार मिळणार आहे. परंतु, मुबलक चारा मिळणे आवश्यक आहे.

केंद्र शासनाच्या निकषानुसार दर
- केंद्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषानुसार छावणीतील मोठ्या गुरांना प्रतिदिन ७० रुपये लहान जनावरांना प्रतिदिन ३५ रुपये या दराने छावणीचालकांना रक्कम देण्यात येणार आहे.
- छावण्या सुरू असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना छावण्यांच्या तपासणी तद्नुषंगिक बाबींसाठी छावणीच्या खर्चाच्या ०.२५ टक्के रक्कम प्रशासकीय खर्च म्हणून देण्यात येणार आहे.
- शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना ते १० दिवस बैलांना घरी नेण्याची परवानगी तशी मागणी केल्यास मिळणार आहे.
- छावणीतील जनावरांना आठवड्यातून एकदिवसाआड याप्रमाणे किमान तीन दिवस पेंड द्यावी.
यामुळे होणार जनावरांची उपासमार..

मुबलक पाणी, चारा अन् सावलीच्या ठिकाणी उभारा..
स्थानिकजनावरांची गरज भागून चारा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी शक्यतो गुरांच्या छावण्या उभाराव्यात, असे अध्यादेशात म्हटले आहे. तसेच गुरांच्या छावण्यांच्या ठिकाणी मुबलक पाणी, चारा जनावरांसाठी सावली उपलब्ध असणे तशी सोय करणे, छावणीचे ठिकाण बाजाराजवळ असणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे. तसेच सहकारी साखर कारखान्यांनी गुराचा चारा म्हणून उसाच्या वाड्याचा वापर करावा बगॅस, युरिया मळीचे मिश्रण करून पशुखाद्य तयार करावे, अशा सूचना केल्या आहेत.
कडब्याच्या एका पेंढीचा बाजारभाव ३० रुपये आहे. तर एक मे. टन उसाचा दर दोन ते अडीच हजार रुपये आहे. दुभत्या गायीला दिवसातून किमान ते पेंढ्या, बैलासाठी ४, म्हशीसाठी पाच पेंढ्या लागतात. सरासरी पेंढ्या ग्राह्य धरल्या तर १२० रुपये खर्च येतो.
शिवाय आठवड्यातून तीन दिवस पशुखाद्य देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. बाजारात सध्या पशुखाद्याचा दर प्रतिकिलो ३० ते ३५ रुपयांपर्यंत आहे. तसेच पाणी अन्य बाबींसाठी येणारा खर्च वेगळाच आहे.

स्वत:चे नुकसान करून जनावरांना जास्तीचा चारा खाऊ घालणाऱ्या संस्था कदाचित कमीच असतील. कमी रक्कम मिळणार असल्याने जनावरे जगवण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा मेळ घालणे तारेवरची कसरत ठरणार आहे. त्यामुळे छावणीतही जनावरांची उपासमार होणार हे निश्चित.