आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरजेनुसार चारा डेपो, जिल्ह्यातील पाणीसाठे राखीव ठेवण्याच्या संबंधितांना सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - सलग चौथ्या वर्षीही पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहेत. तसेच तीव्र पाणीटंचाईचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपलब्ध पाणीस्रोत पिण्यासाठी राखीव ठेवणे आणि जेथे ज्याप्रमाणे आवश्यकता असेल तेथे गरजेनुसार चारा डेपो आणि चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. मात्र, कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावरच राज्य शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटुंबकल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.
जिल्ह्यात टंचाई परिस्थिती असल्यामुळे प्रत्येक यंत्रणेने सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून काम करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री डॉ. सावंत यांनी शनिवारी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, आमदार मधुकरराव चव्हाण, राहुल मोटे, राणाजगजितसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, झेडपीचे उपाध्यक्ष सुधाकर गुंड, शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. सावंत यांनी जिल्ह्यातील पाणीपरिस्थिती, पीकपरिस्थिती, उपलब्ध पाणीसाठा, जिल्ह्यात सुरू असणारी रोजगार हमी योजनेची कामे, उपलब्ध मजूर संख्या आदींचा तपशीलवार आढावा घेतला.

आमदारांनी दिला रोहयो कामांवर भर
यावेळीअामदार चव्हाण यांनी गावातील स्त्रोत कोरडे पडत असून, त्याठिकाणी तत्काळ पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली. रोहयोवर कामांवर अधिक लक्ष द्यावे, चारा छावण्यास सुरू कराव्यात, अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या. टंचाईच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्याची सूचना आमदार मोटे यांनी केली तर आमदार पाटील यांनी जिल्ह्यालगतच्या सीमेवरील तालुक्यातील काही ठिकाणचे पाणीसाठे आरक्षित करण्यासंदर्भात कार्यवाहीची मागणी केली. आमदार चौगुले यांनी, रोहयोअंतर्गत ज्या कामांची मागणी येईल, त्यांना तत्काळ मंजुरी देण्याबाबत विचार व्हावा, अशी सूचना केली.

सचिवां सोबत बैठक
जिल्ह्यातीलटंचाईच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात येत असणा-या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित विभागांच्या सचिवांबरोबर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांची बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कृषी विभागाने मार्गदर्शन करावे
सध्याटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना कोणते पीक घ्यावे अथवा पिकांची निवड कशी करावी, याबाबत कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागांनी मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पर्यायी स्रोतांचे अधिग्रहण करा
सध्याअधिग्रहण केलेले पाण्याचे स्त्रोत आटत चालले आहेत. त्यामुळे तत्काळ पर्यायी स्त्रोतांची पाहणी करून आणि पाण्याची गुणवत्ता तपासून त्याचे अधिग्रहण करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे केंद्र शासनाचा निधी मिळाला नसल्याने बंद पडल्याचा उल्लेख करून यासंदर्भात राज्यस्तरावर काही करता येईल का, याचा विचार केला जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कायमस्वरुपी उपाययोजनांवर भर
जिल्ह्याच्याविविध भागात आवश्यकतेप्रमाणे चारा डेपो अथवा चारा छावणी सुरू करता येईल का, या पद्धतीनेही विचार केला जाईल. त्यासंदर्भात काही सामाजिक संस्थांशीही चर्चा केली जाईल. तात्पुरती मलमपट्टी आवश्यक असली तरी आपला भर हा कायमस्वरुपी उपाययोजनांवर असेल, असे पालकमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. पीकविम्याची तसेच अनुदानाची रक्कम शेतक-यांपर्यंत पोहोचेल, यासंदर्भात सर्वांना ताकीद द्या, शेतक-यांचे पैसे कुणीही विनाकारण अडकवून ठेवू नयेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

रोहयोचीकामे करण्याच्या सूचना
जिल्ह्यातरोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे हाती घ्यावी, मंडलनिहाय त्यासाठी नियोजन करा आणि संबंधित मंडळाची जबाबदारी संबंधित उपअभियंत्यांवर द्या, असे निर्देश त्यांनी दिले. सध्याच्या टंचाई परिस्थितीत कामांची संख्या वाढविण्याचे आणि मागेल त्याला काम मिळेल, हे पाहणे आणि ठराविक कालावधीत मजुरांना वेतन मिळेल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रत्येक काम हे साखळी पद्धतीने चालते. त्यामुळे सर्वच यंत्रणांची यात जबाबदारी वाढते. प्रत्येकाने त्यांची जबाबदारी लोकसेवेच्या भावनेतून पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

रोहयोची कामे करण्याच्या सूचना

बातम्या आणखी आहेत...