आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fodder, Water About Taluka Level Of Information To Measure

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चारा, पाण्याबाबत तालुकास्तरावर उपाययोजना करण्याच्या सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर; जिल्ह्यातचारा पाण्याची स्थिती बिकट आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने तालुकानिहाय चारा पाण्याची स्थिती काय आहे? जनावरांच्या तुलनेत चाऱ्याची स्थिती, पाणीटंचाईबाबत दररोज माहिती घ्यावी. तालुकास्तरावर त्यासंबंधी आवश्यक उपाययोजनाबाबत सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी, चारा, टंचाईबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो दिनेश भालेदार, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण, श्रीमंत पाटोळे, शहाजी पवार, संजय तेली, मनीषा कुंभार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले की, जिल्ह्यात अजून समाधानकारक पाऊस झाला नाही. पाऊस झाला म्हणून टंचाई परिस्थितीकडे दुर्लक्ष होऊ नये. पाणी टंचाई, चारा टंचाईबाबत तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे.

या बैठकीत तालुकानिहाय मंडलनिहाय आतापर्यंत किती पाऊस झाला, टँकर किती चालू आहेत, चारा, पाणी टंचाई बाबत अडचणीची माहिती जाणून घेतली. तसेच आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

या बैठकीमध्ये जनावरांसाठी चारा आणि पेरणीसाठी बियाणे याची उपलब्धतेची माहिती घेतली. मका, ज्वारी, चारा पिके घेण्यात यावीत. महिन्यांत चारा नव्याने किती उपलब्ध होऊ शकेल याबाबत सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बंद प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण करून योजना सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ज्या योजनात पाणी नाही तेथे योजना घेऊ नये. जेथे शाश्वत पाणी आहे तेथे योजना घेण्यात याव्यात. जिल्हा परिषदेने प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या योजना सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

पाणीपातळीचा अहवाल सादर करा...
जिल्ह्यात७५ हजार हेक्टर क्षेत्रावर कंपार्टमेंट बंडिंग झाले आहे. पाऊस झालेल्या भागात विहिरींच्या पाण्याची किती पातळी वाढली आहे, त्याचप्रमाणे इतकाच पाऊस झालेल्या मात्र कंपार्टमेंट बंडिंग झालेल्या भागातील विहिरींच्या पाण्याची स्थिती काय आहे ? याची तुलना करावी. विहीर पुनर्भरण झालेल्या गावात किती पाऊस झाल्यावर विहिरींचे किती पाणी वाढले आहे, याचीही माहिती संकलित करावी. पाऊस झाला आहे पण विहीर पुनर्भरण झाले नाही, अशा गावातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली किंवा नाही, याविषयी गावनिहाय अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मुंढे यांनी दिल्या.