आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूूरच्या विठ्ठल मंदिर अन्नछत्रात अन्नाचा तुटवडा, प्रशासन म्हणते सर्व काही आलबेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- येथील श्री विठ्ठल मंदिर प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे अन्नछत्रामध्ये वारंवार अन्नाचा तुटवडा पडत आहे. प्रसादासाठी भाविकांना तिष्ठत ताटावरच बसावे लागते. भाविकांना अनेकदा प्रसादात चपाती मिळत नाही. त्यामुळे केवळ भात आणि आमटीवरच भूक भागवावी लागत असल्याची भाविकांची तक्रार आहे. 

लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे येतात. श्री विठ्ठल हा गरीब, कष्टकऱ्यांचा देव म्हणून ओळखला जातो. त्याच्या पायावर माथा टेकल्यावर भाविकांचे समाधान होते. त्याच्या पदस्पर्श दर्शनाने त्यांच्या आत्म्याची भूक भागते हे सत्य असले तरी पोटाची भूक भागवण्यासाठी प्रसाद घ्यावा लागतो. यात गरिबी, श्रीमंतीचा भेद नसतो. त्यामुळे परगावच्या भाविकांसाठी काही वर्षांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अन्नछत्र चालवते. पण तेथे सध्या अन्नाचा तुटवडा भासत आहे. चपाती (पोळी) कमी पडल्यानंतर भात, पाणीदार आमटीवरच भाविकांना भूक भागवावी लागत आहे. रोज २५ ते ३० हजार भाविक येथे येतात. रोज अन्नछत्रात किमान एक ते दीड हजार भाविक याचा लाभ घेतात. 

अन्नछत्रात भाविकांना चपाती, आमटी, सुकी भाजी, भात दिला जातो. दशमी, द्वादशी या दिवसांवरून भाविकांचा अंदाज बांधून समिती प्रसादाचे नियोजन करते. प्रसाद उत्कृष्ट बनवणे अपेक्षित आहे. परंतु चपात्या नीट बनवल्या जात नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यातून चपातीच हद्दपार केली. आता सुरुवातीच्या तासाभरातच चपाती मिळते. त्यानंतरच्या भाविकांना भात, वाढत्या मागणीमुळे तयार आमटीच पाणी घालून वाढवली जाते. हे अन्नछत्र भाविकांच्या देणग्यांवर चालत असले तरी उत्कृष्ट पोटभर प्रसाद मिळत नाही. अक्कलकोट, गोंदवले येथील अन्नछत्रांच्या तुलनेत येथे चांगल्या सुविधा नसल्याची भाविकांची खंत आहे. येथे संध्याकाळीही प्रसाद व्यवस्था करण्याची भाविकांची मागणी आहे. 

भाविकांच्या हितासाठीचेसर्व निर्णय घेतले जातील. अन्नछत्रातील प्रसादातही सुधारणा करण्यात येतील. भाविकांना रुचकर, स्वादिष्ट आणि पोटभर प्रसाद देण्याचा निश्चित प्रयत्न करू. 
- अतुल भोसले, अध्यक्ष, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर 

संख्येनुसार वेळ आणि प्रसाद वाढवले जाते 
मंदिर समितीच्या अन्नछत्रात शिस्त दिसत नाही. भाविकांच्या देणगीतून हे चालवले जाते. चांगला प्रसाद देण्यात मंदिर प्रशासनाला काय अडचण आहे. देवाच्या प्रसादाला नाव ठेवण्याचे आपले संस्कार शिकवण आहे. अधिक बोलणे योग्य नाही. 
- तेजस्विनी जाधव, (वय ५५) भाविक

मुबलक धान्यसाठाआहे. रोज एक हजार भाविकांसाठी प्रसाद बनवला जातो. संख्या वाढल्यास वेळ वाढवली जाते. त्यानुसार प्रसाद बनवतो. तांदळाची खिचडी, खीर असलेल्या दिवशी प्रसादात चपाती देत नाही. 
- डॉ.विजय देशमुख, कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती, पंढरपूर 
बातम्या आणखी आहेत...