आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज फुटबॉलदिन: 1012 शाळांत फुटबॉल पोचवण्याची घाई, शाळांना अशैक्षणिक दिवस जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने वातावरण तयार होण्यासाठी राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने एकाच दिवशी म्हणजे शुक्रवारी १० लाख विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळावे असे नियोजन केले आहे. यासाठी राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयातून फुटबॉल खेळावा असे परिपत्रक काढले आहे. यासाठी शाळांना अशैक्षणिक दिवसही जाहीर केला आहे. सर्व शाळांना परिपत्रकही पोचले. 
 
यासाठी राज्य शासनाने प्रत्येक शाळांना तीन फुटबॉल देण्याचे जाहीर केलेे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. सोलापूर शहर जिल्ह्यातून १०१२ शाळांंची नोंदणी झाली आहे. परंतु अद्यापपर्यंत शहरासह जिल्ह्यातील एकाही शाळांना फुटबॉलच पोहोचले नाहीत. रात्री उशिरापर्यंत फुटबॉल येणार असल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही सकाळी तालुक्यात संबंधित गटशिक्षणाधिकारी शहरात महानगरपालिका प्रशासनअधिकारी यांच्याकडे हे फुटबॉल पोहचवू. ते याचे नियोजन ते करतील. त्यामुळे ग्रामीण भागात तरी हे फुटबॉल शुक्रवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
तालुक्याला फुटबॉल रवाना : हजार १२ शाळांनी फुटबॉल मिळण्यासाठी नोंदणी केली होती. कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी रात्री ११. ३० वाजता हजार ५० फुटबॉल आले. एका बॉक्समध्ये २५ फुटबॉल असे १२२ बॉक्स क्रीडा कार्यालयातील स्टाफ, सोलापूर शहर जिल्ह्यातील क्रीडाशिक्षकांनी ते ट्रकमधून उतरून घेतले. त्यानंतर रात्रीतून सर्व तालुक्याला रवाना केले. 
 
है तय्यार हम ... 
शासनाचे नियोजन फसले आहे. ग्रामीण भागात जरी फुटबॉल पोचले नसले तरी वरवडे (ता.माढा) येथील विनायक विद्यालय वरवडे यांनी अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय या अभियानासाठी शाळेच्या मैदानावर शुक्रवारी फुटबॉल खेळण्याची तयारी केली आहे.
- हरिदास रणदिवे, क्रीडाशिक्षक 
 
मुख्य कार्यक्रम पार्कवर सकाळी वाजता 
सर्वशाळा महाविद्यालयांनी सकाळी ते १२ आणि दुपारी ते या वेळात फुटबॉल खेळावे, असे अावाहन जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम शहरात इंदिरा गांधी स्टेडियमवर सकाळी ते ११ वाजेपर्यंत होईल. 
 
बातम्या आणखी आहेत...