आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Autorikshaw Permit Compulsory Of Speaking, Wirting Marathi

रिक्षा परमिटसाठी मराठी बोलणे, लिहिणे अनिवार्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्रात रिक्षा व्यवसाय करायचा असेल तर रिक्षाचालकांना मराठी बोलता वाचता येणे अनिवार्य आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी राज्यासह सोलापूर आरटीओ कार्यालयात सुरू झाली आहे. दोन दिवसांपासून रिक्षा परवान्यासाठी मुलाखती घेण्याचे काम सुरू असून आतापर्यंत २०० जणांच्या मुलाखती झाल्या आहेत. त्यापैकी २४ जणांना मराठीत समाधानकारक बोलता आले नाही. त्यांचे परवाने राखून ठेवण्यात आलेले आहेत.

सोलापूर आरटीओ कार्यालयाच्या वतीने ४२६ रिक्षांचे परवाने देण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री रावते यांच्या आदेशानुसार चालकांस परमिट देण्यापूर्वी रिक्षाचालकांना कितपत मराठी बोलता वाचता येते हे पाहणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील दोन कक्षात सध्या रिक्षाचालकांच्या मुलाखती सुरू आहे. मंगळवारपासून दररोज १०० चालकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. रिक्षा परमिटसाठी येणाऱ्या सर्व रिक्षा चालकांना मराठीत प्रश्न विचारले जातात आणि भाषेची जाण कितपत आहे हे तपासण्यात येत आहे.

अशी होते मुलाखत
चालकांस मराठीत प्रश्न विचारले जातात. काहीना मराठी वाचण्यासही सांगण्यात येत आहे. ज्या रिक्षाचालकांना मराठी बोलता येणार नाही तसेच त्यांचे मराठी भाषेचे ज्ञान समाधानकारक नसेल अशांची वेगळी यादी करण्यात येत आहे. आतापर्यंत २४ जणांनी मुलाखतीमध्ये असमाधानकारक उत्तरे दिली आहे. याची माहिती वरिष्ठांना पाठवून देण्यात येणार आहे. वरिष्ठांच्या निर्णयानंतरच या चालकांना परमिट द्यायचे की नाही हे ठरविले जाणार आहे.

मराठीतून मुलाखती
परिवहन मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे रिक्षाचालकांना मराठी भाषा कितपत बोलता येत आहे. हे पाहण्यात येत आहे. ऑन कॅमेरा मुलाखती घेण्यात येत आहे. असमाधानकारक उत्तरे दिलेल्यांचा लवकरच अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहे. बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर.