आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराला पाणी हवंय, तर २२.६३ कोटी जमा करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर शहराचा पाणीप्रश्न आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाची थकीत रक्कम महापालिकेने भरल्याने पाणी मिळण्यास विलंब होणार आहे. पुढील वर्षीसाठी लागणाऱ्या पाण्याचे १५ कोटी आणि थकीत रक्कम कोटी ६३ लाख रुपये महापालिकेला भरावे लागणार आहेत. ही रक्कम भरल्याशिवाय पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. विभागीय आयुक्तांनी ही रक्कम जमा करण्याच्या सूचनाही मनपाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. चालू आवर्तन मिळण्यासाठी महापालिकेला अंदाजे २२ कोटी ६३ लाख रुपये भरावेच लागणार आहेत.

उजनी धरणातून महापालिकेने घेतलेल्या पाण्याची अाजपर्यंत कोटी ६३ लाख रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेला वर्षभरात उजनीतून २० टीएमसी पाणी घ्यावे लागते, यासाठी ३० कोटी रुपये शासनाला भरावे लागतात. यातील ५० टक्के रक्कम म्हणजेच १५ कोटी पुढील वर्षीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी भरावे लागणार आहेत. ही रक्कम वेळेत भरल्यास शहराला पाणी मिळणे अशक्य आहे. विभागीय आयुक्तांनी शहर जिल्ह्यातील पाणीटंचाईबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली.

महापालिकेकडे कोटी ६३ लाख रुपये थकीत
महापालिकेने शहरासाठी उजनी धरणातून घेतलेल्या पाण्यापोटी कोटी ६३ लाख रुपये थकीत आहेत. शिवाय पुढील वर्षी लागणाऱ्या पाण्यापैकी ५० टक्के पाण्याची रक्कम महापालिकेला भरावी लागणार आहे. महापालिकेस एका वर्षात २० टीएमसी पाणी लागते, यापोटी त्यांना १५ कोटी रुपये आरक्षित करण्यासाठी भरावे लागणार आहेत. एस.के.चौगुले, अधीक्षक अभियंता.

१० जानेवारीपर्यंत पाणी सोडण्याची होती मागणी...
सोलापूर शहराला पाणी सोडण्यासंबंधी मनपा आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. औज बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी असून शहराला पाणी उपलब्ध होण्यासाठी १० जानेवारीपर्यंत पाणी सोडावे, अशी मागणी केली होती. पाणी सोडण्याचे आदेश देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना असल्याने ते निर्णय घेतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

यंदा पाण्यासाठी थकीत रक्कम भरावी लागणार
महापालिकेकडे उजनी धरणातून सोडलेल्या पाण्याची थकबाकी आहे. विभागीय आयुक्तांना पाणी सोडण्यासंबंधी विनंती केली असता, थकबाकी भरल्याशिवाय पाणी सोडण्याचा निर्णय घेता येणार नाही, असे विभागीय आयुक्तांनी बैठकीतच स्पष्ट केले. महापालिकेकडे किती थकबाकी याची माहिती नाही. नगरपालिकेकडे असलेली थकबाकी आम्ही शासनाकडे जमा करू. तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी

पाण्यावर सिंचन विभागासोबत बैठक हाेणे आवश्यक
उजनीतील सोडलेल्या पाण्याच्या बिलाबाबत सिंचन विभागाकडून पत्र आले आहे. त्याबाबत काही अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी सिंचन विभागासोबत बैठक होणे आवश्यक आहे. आर.एन. रेड्डी, उपअभियंता, मनपा पाणीपुरवठा विभाग