आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रसंगी सत्तेतून बाहेर पडू : खासदार शेट्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतो आणि लढत राहणार. बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांची मक्तेदारी बंद व्हावी ही आमची मागणी होती. आता मक्तेदारी संपुष्टात आल्याने व्यापारी शेतीमालाचे दर पाडत आहेत. आम्हाला चळवळ चालवून महात्मा व्हायचे नाही, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा आहे. भाजपची गरज म्हणून आम्हाला सत्तेत घेतले. त्यामुळे वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कधीही सत्तेतून बाहेर पडू, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

सोलापूर दौऱ्यावर आलेले खासदार राजू शेट्टी रविवारी सायंकाळी सिव्हिल चौकात डाॅ. राजेश फडकुले यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘चळवळीतून १०० टक्के प्रश्न सुटत नसतो, चळवळीतून प्रश्न समोर येतात, विचार करायला लावतात. त्यामुळे निर्णय घेणाऱ्यापुढे प्रश्न जातो. चळवळीमुळे उद्देश साध्य होतो पण प्रश्न सुटत नाहीत.’

मंत्रीपद परत करू
भाजपसरकारने त्यांची गरज म्हणून आम्हाला सत्तेत घेतले. यात त्यांच्या फायद्याचा विचार आहे. सत्तेपेक्षा आम्हाला शेतकरी महत्त्वाचा आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर आंदोलन करू. तसेच मंत्रीपदही परत करण्याची तयारी असल्याचे शेट्टी म्हणाले.

महात्मा व्हायचे नाही
चळवळीतूनमाणूस महात्मा होत असतो, प्रश्न सुटत नसतात. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत आहोत, असे खासदार शेट्टी म्हणाले. यावेळी केतन शहा, दीपक आहेरकर, संजीव पाटील, दीपक भोसले, अॅड. गोविंद पाटील आदी उपस्थित होते.
कांदा कापसाला भाव मिळावा
शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा पाच पैसे किलो विकतो. पण तोच कांदा घरापर्यंत येताना १७ रुपयांनी घ्यावा लागतो. ९४ रुपयांच्या कापसापासून तयार होणारा कापडाचा शर्ट हजार रुपयास विकतो. यातील तफावत म्हणजे व्यापाऱ्यांनी निर्माण केलेला दरी आहे. ती कमी झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या कांदा आणि कापसाला भाव मिळाला पाहिजे, असे खासदार शेट्टी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...