आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरसाठी २५० कोटींची समांतर जलवाहिनी मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर शहराला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून उजनी ते सोलापूर अशी जवळपास ११० किलोमीटरची अाणखी एक (समांतर) पाइपलाइन टाकण्याच्या सुमारे २५० कोटी रुपयांच्या एका अाराखड्याला विभागीय अायुक्त चोक्कलिंगम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात अाली. यातून शहराला २७५ एमएलडी इतके पाणी उपलब्ध होईल, असे या प्रस्तावात म्हटले अाहे.

याबाबत मंगळवारी विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांच्याकडे बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग महिन्यात आराखडा तयार करणार आहे. शहरावरील पाणी संकट बंद करण्यासाठी उजनी ते सोलापूर नवीन उर्वरितपान १२
जलवाहिनीटाकणे आवश्यक आहे. उजनी धरणातील पाणी शहरास नदीद्वारे सोडता बंद पाईपलाईनमधून घेऊन जावे असे धोरण शासनाचे अाहे. शहरास नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी एनटीपीसी २५० कोटी रुपये मनपास देण्याचे मान्य केले. २५० कोटीऐवजी १२५० कोटींची योजना करण्याचा मनपाचा विचार होता. आर्थिक अडचणमुळे २५० कोटींची ७५ एमएलडीची योजना करण्याचे नियोजन करण्यात आले. याबाबत पुण्यात झालेल्या बैठकीत २५० ते १२५० कोटींपर्यंतचे चार प्रकारचे प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने समोर ठेवले. त्यावर चर्चा झाली. २५० कोटींची योजना करण्याचे निश्चित करण्यात आले.

प्रस्तावात सुचविलेली कामे
-उजनी ते सोलापूर जलवाहिनी
-उजनी धरणात तीन कोटींचे जॅकवेल
-२७ किमी एमएस पाइप
-८३ किमी पीसीसी पाइप
-७५ एमएलडीची पाण्याची क्षमता

चार निर्णय
१- पाइपच्या बाबत काॅलेज आॅफ इंजिनिअरिंगकडून अभिप्राय घेणे
२-दरवाढीचा नियम नसावा (प्राइज आॅफ एक्सलेशन)
३- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्रस्ताव तयार करावा
४- एनटीपीसी आणि महापालिका यांचे संयुक्त खाते बँकेत काढावे

पुरेसे पाणी उपलब्ध होईल
नवीन ७५ एमएलडी पाणी मिळाल्यास शहरास रोज सुमारे २२५ एमएलडी पाणी उपलब्ध होईल. शहराची गरज १८० एमएलडीची आहे. त्यामुळे समांतर जलवाहिनी झाल्यास शहराची पाण्याची गरज भागेल. राेज पाणीपुरवठा करणे शक्य होईल.

एनटीपीसी जलवाहिनीवरील मागणी राहणार
शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते एनटीपीसीला मनपाकडून देण्यात येईल. त्यापोटी एनटीपीसी मनपास आर्थिक मदत देता उजनी ते सोलापूर एनटीपीसी जलवाहिनी मनपास वर्ग करावे ही मागणी राहणार आहे. त्याबाबत अंतिम निर्णय राज्य केंद्र सरकारमधील मंंत्र्यांच्या पातळीवरील होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...