आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरसाठी उजनी धरणातून पाणी सोडले, सहा हजार क्युसेक्सचा विसर्ग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर, पुणे - सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून शनिवारी सायंकाळी हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. औज बंधाऱ्यातील पाणीपातळी कमी झाल्याने महापालिकेने पाणी सोडण्याची मागणी केली होती. ते औज बंधाऱ्यात पोहोचायला सात दिवस लागतील. या पाण्यामुळे नदीवर असलेल्या १५० पाणीपुरवठा योजनांनाही लाभ होणार आहे.
पाणी सोडल्याची माहिती इंदापूर येथील उजनी पाणी व्यवस्थापन विभागाचे उपअभियंता चांगदेव पाटील यांनी दिली. ते म्हणाले, ‘सोलापूरच्या नागरिकांना पिण्यासाठी हे पाणी सोडण्यात अाले आहे. सलग सात दिवस पाणी सोडण्यात येणार अाहे. उजनी धरणातून किती टीएमसी पाणी सोडणार हे निश्चित नाही. अौज बंधाऱ्यात पाणी पोहोचेपर्यंत ते सोडण्यात येणार अाहे.’

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन नदीतून पाणी सोडण्याबाबत चर्चा केली होती. अामदार प्रणिती शिंदे यांनी पिवळे पाणी सोडणाऱ्यांवर कारवाईची तसेच उजनीतून पाणी सोडण्याची मागणी लावून धरली होती. सध्या उजनी धरणात वजा १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे जिल्ह्यातील चासकमान आणि भामा अासखेड या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यापैकी १.२५ टीएमसी पाणी उजणीत दाखल झाले आहे. पुरेसे पाणी आल्यानंतर सोलापूरकरांची तीन महिन्यांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटेल.
उजनीतून शहरासाठी पाणी सोडण्यात आले. हजार क्युसेक्सने पाणी सोडले असून पोहोचण्यास सात ते ११ दिवस लागतील. शिवाजी चौगुले, अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र प्राधिकरण.

नदीकाठी वीज खंडित
धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवल्याने दोन तासांची वीज देण्याचे आदेश महावितरणला देण्यात आले आहेत. नदीपात्र बॅकवाॅटरमधून पाण्याची चोरी उपसा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी