आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलभूषण जाधवांच्या सुटकेसाठी माता-पित्यांचे विठूरायाला साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- पाकिस्तानच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी लष्करी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुखरूप सुटकेसाठी त्यांच्या मातापित्यांनी पंढरीच्या विठूरायाला साकडे घातले आहे. कुलभूषण यांच्या आई अवंती आणि वडील सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त सुधीर जाधव हे तुळजापूरहून सोमवारी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी आपला मुलगा सुखरूप मायदेशी यावा, असे साकडे श्री विठूरायाला आणि रुक्मिणीमातेला घातले.
     
याच पार्श्वभूमीवर मंगळवारी जाधव दांपत्यांने सकाळी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती मिळवली आहे. हा निर्णय कायम राहावा आणि आपला मुलगा परत यावा. जाधव दांपत्याने  माजी पोलिस उपायुक्त अकबर मुजावर, दुसरे मित्र डॉ. शीतलकुमार शहा आणि रमेश मोहिते यांची सोलापुरात भेट घेतली. कोटणीस यांच्या स्मारकासही त्यांनी भेट दिली.