आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्शीत चार चोरट्यांना पकडले, १५ वाहने जप्त- बार्शी पोलिसांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी- शहरातील दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरून बीड परभणी जिल्ह्यात विल्हेवाट लावणाऱ्या बीड, परभणी आणि गंगाखेड परिसरातील चार चोरट्यांना येथील पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून चार कार ११ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. जुबेर रजाक पठाण (वय २२), रफिक हुसेन शेख (१९, रा.तेलगाव नाका, बीड), शेख जावेद शेख मेहमुद (२३, रा. सागर नगर,परभणी), शेख अझहर शेख मेहताब (३३, रा.सारडा कॉलनी, गंगाखेड, जि. परभणी) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

तपासात येथील पोलिसांत दाखल झालेले सहा गुन्हे उघड झाल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक गजेंद्र मनसावाले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पोलिस उपनिरीक्षक अन्वर मुजावर, पोलिस उपनिरीक्षक सत्यजित अधटराव उपस्थित होते. पोलिस कर्मचारी रात्र गस्त घालताना संशयितांची चौकशी केल्यावर चोरीचा गुन्हा उघड झाला. संशयितांच्या चौकशीतून त्यांच्या इतर साथीदारांची माहिती मिळाली. त्यांच्याकडून नऊ लाख २७ हजार रूपयांची वाहने हस्तगत करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अन्वर मुजावर, नारायण शिंदे, इसाक सय्यद, शामराव गव्हाणे, कैलास हरिहर, चंद्रकांत घंटे, लालसिंग राठोड, संताजी आलाट, अभय उंदरे, इसामियाँ बहिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बातम्या आणखी आहेत...